agriculture news in marathi, Rabi Crop Loan Allocation Slowly | Agrowon

रब्बी पीक कर्जवाटप संथगतीने
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

परभणी : जिल्ह्यात यंदा रब्बी पीक कर्जाचे वाटप संथगतीने सुरू असून, २८० कोटी ८३ लाख ४७ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना सोमवार(ता. १८)पर्यंत १ हजार ६४६ शेतकऱ्यांना १३ कोटी ३८ लाख ४७ हजार रुपये पीक कर्ज वाटप केले आहे.

परभणी : जिल्ह्यात यंदा रब्बी पीक कर्जाचे वाटप संथगतीने सुरू असून, २८० कोटी ८३ लाख ४७ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना सोमवार(ता. १८)पर्यंत १ हजार ६४६ शेतकऱ्यांना १३ कोटी ३८ लाख ४७ हजार रुपये पीक कर्ज वाटप केले आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंका आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने कर्ज वाटप केले आहे. परंतु जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्ज वाटपास सुरवात केलेली नाही. यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना २८० कोटी ८३ लाख ४७ हजार रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ६९ कोटी ५८ लाख ३३ हजार रुपये, राष्ट्रीयीकृत बॅंका १९१ कोटी १६ लाख ५६ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक २० कोटी ८ लाख ५८ हजार रुपये यांचा समावेश आहे.

एक ऑक्‍टोबरपासून रब्बी पीक कर्ज वाटपास सुरवात होते. सध्या बॅंक कर्मचारी कर्जमाफीच्या याद्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे पीक कर्ज वाटपाची गती संथ आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्जवाटपास सुरवात केलेली नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ९७५ शेतकऱ्यांना १० कोटी ३६ लाख रुपये (३.४५ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ६७१ शेतकऱ्यांना ३ कोटी २ लाख ३९ हजार रुपये एकूण १ हजार ६४६ शेतकऱ्यांना १३ कोटी ३८ लाख ३९ रुपये (३.३० टक्के) पीक कर्ज वाटप केले आहे.

५४ हजार शेतकऱ्यांना खरीप कर्ज वाटप
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार ४०० कोटी ९० लाख ७३ हजार रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना ४०६ कोटी १७ लाख ३० रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला १७५ कोटी ४० लाख २० हजार रुपये उद्दिष्ट असताना ४० हजार ६८२ शेतकऱ्यांना ८७ कोटी ४३ लाख ३० हजार रुपये, राष्ट्रीयकृत बॅंकांना १ हजार ७० कोटी ९५ लाख २१ हजार रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना ११ हजार ८६ शेतकऱ्यांना ३०० कोटी ३ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १५४ कोटी ५५ लाख ३२ हजार रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना २ हजार ७०८ शेतकऱ्यांना १८ कोटी ७१ लाख रुपये असे एकूण ५४ हजार ४७६ शेतकऱ्यांना ४०६ कोटी १७ लाख ३० हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...