agriculture news in marathi, Rabi crops growth in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात रब्बी पिके जोमात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाची स्थिती बरी आहे. मात्र धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मात्र रब्बी पेरणी शंभर टक्के क्षेत्रावर होऊ शकली नसल्याची माहिती आहे. यातच कमी पाणी व कमी खर्चाचे पीक म्हणून शेतकरी हरभऱ्याकडे अधिक वळल्याचे चित्र यंदा आहे.

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाची स्थिती बरी आहे. मात्र धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मात्र रब्बी पेरणी शंभर टक्के क्षेत्रावर होऊ शकली नसल्याची माहिती आहे. यातच कमी पाणी व कमी खर्चाचे पीक म्हणून शेतकरी हरभऱ्याकडे अधिक वळल्याचे चित्र यंदा आहे.

सध्या विजेसह पाण्याची समस्या आहे. पाऊस यावल, शहादा, चोपडा, शिरपूर आदी सातपुड्यालगतच्या भागातही हवा तसा नव्हता. त्यामुळे या भागातील मक्‍याचे क्षेत्र कमी झाले. कारण मक्‍याला अधिक पाणी आवश्‍यक असते. या भागातील मका पिकाची जागा हरभऱ्याने घेतली असून, संकरित प्रकारचे दोनतीनदा सिंचन केल्यानंतर जोमात येणारे हरभऱ्याचे वाण या भागात पेरण्यात आले आहे.

ऑक्‍टोबरमध्ये जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, मुक्ताईनगर व अमळनेरचा तापीकाठ आदी भागात काळ्या कसदार जमिनीत बऱ्यापैकी ओलावा होता. त्यामुळे दिवाळीनंतरच दादर(ज्वारी)ची पेरणी झाली. दादर निसवली असून, थंडीमुळे अनुकूल स्थिती आहे. दादरसह हरभराही जोमात आहे. तर गव्हाची पेरणी अपेक्षेपेक्षा कमी झालेली असली तरी पीक बऱ्यापैकी आहे.

जळगाव जिल्ह्यात गव्हाची सुमारे २९ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तर दादरची २३ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. मक्‍याची सुमारे ४० हजार हेक्‍टरवर पेरणी झाली असून, हरभऱ्याची सर्वाधिक ९० हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. सूर्यफूल, करडई यांचे क्षेत्र नगण्य आहे. बाजरीची पेरणीही काही भागात सुरू झाली आहे. रब्बीची ९५ टक्के पेरणी जळगाव जिल्ह्यात झाली.

धुळे व नंदुरबारात हरभऱ्याची अनुक्रमे २८ व २७ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. धुळ्यात गव्हाची सुमारे साडेसात हजार हेक्‍टरवर पेरणी झाली असून, नंदुरबारातही सात हजार हेक्‍टरवर पेरणी आहे. नंदुरबारमधील शहादा, धुळयातील शिरपूर, धुळे व शिंदखेडा भागात दादरची बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. धुळ्यात दादरची पेरणी सुमारे १३ हजार हेक्‍टरवर तर नंदुरबारातही चार हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. नंदुरबारात मक्‍याची पेरणी सुमारे १२ हजार हेक्‍टरवर तर धुळ्यात मक्‍याची पेरणी सुमारे ११ हजार हेक्‍टरवर झाली आहे. परंतु धुळ्यासह नंदुरबारात रब्बी पेरणीचा लक्ष्यांक १०० टक्के गाठण्यात यश आलेले नाही. धुळ्यात ७२ टक्के तर नंदुरबारात सुमारे ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यंदा आमच्या भागात हरभरा अधिक आहे. पाऊस कमी असल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे कमी पाण्याचे पीक म्हणून हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
- पुरुषोत्तम पटेल,
शेतकरी, शहादा (जि. नंदुरबार)

दादरसह हरभऱ्याचे पीक आमच्या भागात जोमात आहे. सध्या थंडी असल्याने पिकांना अनुकूल वातावरण आहे. बाजरीची पेरणी सुरू झालेली नाही.
- संदीप नारखेडे,
शेतकरी, आसोदे (ता. जळगाव)

इतर बातम्या
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत असंतोष...मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...