Agriculture News in Marathi, rabi Crops Sowing Area, India | Agrowon

रब्बी पीक पेरणी ५१ टक्क्यांवर
वृत्तसेवा
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली ः देशात रब्बी पीक पेरणी ५१ टक्क्यांवर म्हणजेच ३१५.८६ लाख हेक्टरवर झाली अाहे. हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.६९ लाख हेक्टरने कमी अाहे. मुख्यतः गहू पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली अाहे, असे कृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या पीक पेरणी अाकडेवारीवरून दिसून येत अाहे.

देशात रब्बी पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र ६२३.५३ लाख हेक्टर एवढे अाहे. गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक अाहे; मात्र उत्तर प्रदेश अाणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला अाहे.

नवी दिल्ली ः देशात रब्बी पीक पेरणी ५१ टक्क्यांवर म्हणजेच ३१५.८६ लाख हेक्टरवर झाली अाहे. हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.६९ लाख हेक्टरने कमी अाहे. मुख्यतः गहू पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली अाहे, असे कृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या पीक पेरणी अाकडेवारीवरून दिसून येत अाहे.

देशात रब्बी पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र ६२३.५३ लाख हेक्टर एवढे अाहे. गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक अाहे; मात्र उत्तर प्रदेश अाणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला अाहे.

या भागात गहू पेरणी कमी क्षेत्रावर झाली अाहे; मात्र भात, कडधान्ये, भरडधान्ये पिकांची पेरणी अधिक क्षेत्रावर झाली अाहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये कडधान्य पेरणी अधिक क्षेत्रावर झाली अाहे.
कृषी मंत्रालयाच्या अाकडेवारीनुसार, शुक्रवार (ता. २४) पर्यंत रब्बी पेरणी ३१५.८६ लाख हेक्टरवर झाली अाहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत ३२०.५५ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी झाली होती. गहू पेरणी ११०.६६ लाख हेक्टरवर झाली अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १२६.३५ लाख हेक्टरवर झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात लागवड अधिक क्षेत्रावर झाली अाहे.

भात लागवड क्षेत्र ९.४९ लाख हेक्टरवर पोचले अाहे. कडधान्यांची पेरणी १०१.४३ लाख हेक्टरवर झाली अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८९ लाख हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली होती. भरडधान्ये पीक क्षेत्र ३६.३५ लाख हेक्टरवर पोचले अाहे, तर तेलबियांची पेरणी कमी क्षेत्रावर म्हणजेच ५७.९३ लाख हेक्टरवर झाली अाहे.

दक्षिण भारतात भात लागवडीला वेग
तमिळनाडू, अांध्र प्रदेश, केरळ अाणि तेलंगणामध्ये अधिक क्षेत्रावर भात लागवड झाली अाहे. गेल्या अाठवड्यापर्यंत ८.४२ लाख हेक्टरवर भात लागवड झाली होती; मात्र या अाठवड्यात भात लागवड क्षेत्र ९.४९ लाख हेक्टरवर पोचले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...