Agriculture News in Marathi, rabi gram Crop Sowing Area seen rising, Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याच्या विक्रमी पेरणीचे संकेत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

जळगाव ः जिल्ह्यात यंदा हरभऱ्याची विक्रमी पेरणी होईल, असे संकेत असून, गुलाबी बोंड अळीग्रस्त कपाशीचे क्षेत्र रिकामे करून हरभरा पेरणीचा सपाटा सुरू आहे. पेरणी आणखी आठ ते १० दिवस सुरू राहील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ८४ हजार हेक्‍टरवर रब्बी हंगाम उभा राहील, असे उद्दिष्ट कृषी विभागाने ठरविले आहे. पेरणीला दिवाळीनंतर वेग आला. दिवाळीपूर्वी आठवडाभरापासून दादर (ज्वारी), हरभरा व मक्‍याची पेरणी सुरू झाली होती.

जळगाव ः जिल्ह्यात यंदा हरभऱ्याची विक्रमी पेरणी होईल, असे संकेत असून, गुलाबी बोंड अळीग्रस्त कपाशीचे क्षेत्र रिकामे करून हरभरा पेरणीचा सपाटा सुरू आहे. पेरणी आणखी आठ ते १० दिवस सुरू राहील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ८४ हजार हेक्‍टरवर रब्बी हंगाम उभा राहील, असे उद्दिष्ट कृषी विभागाने ठरविले आहे. पेरणीला दिवाळीनंतर वेग आला. दिवाळीपूर्वी आठवडाभरापासून दादर (ज्वारी), हरभरा व मक्‍याची पेरणी सुरू झाली होती.

सोयाबीन, उडीद, मुगाच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रावर ही पेरणी सुरू होती. त्यातच दिवाळीनंतर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप वाढला. पूर्वहंगामी कपाशीवर हा प्रादुर्भाव अधिक होता. मजूर अळीग्रस्त कापूस वेचत नाही. मजुरी अधिक लागेल आणि उत्पादनही हवे तसे येणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र रिकामे करायला सुरवात केली. त्यात कमी पाण्यात व कमी खर्चात येणारे पीक म्हणून हरभरा पिकाला शेतकरी पसंती देत असून, हरभऱ्याची पेरणी सुरूच आहे.

२४ हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी
जिल्ह्यात ३० हजार हेक्‍टरवर गहू पेरणी अपेक्षित अाहे. सद्यःस्थितीत सुमारे २४ हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. तापी काठावरील गावे आणि मुबलक कृत्रिम जलसाठे असलेल्या भागात गव्हाची पेरणी सुरू आहे. आणखी १० ते १२ डिसेंबरपर्यंत पेरणी करता येणार असल्याने अनेक शेतकरी गहू पेरणीसाठी शेत तयार करणे व इतर व्यवस्था करत असल्याची माहिती आहे.

मका पेरणीलाही वेग
पुरेसा चारा व उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाची पेरणी व लागवडही वेगात सुरू आहे. यंदा रावेर, यावल भागात मका पीक कमी असले तरी जळगाव, चोपडा, पाचोरा भागात मका लागवड किंवा पेरणी अधिक दिसून येत आहे.

आवर्तनांचा लाभ
जिल्ह्यात वाघूर, अनेर व हतनूर प्रकल्पांमधून रब्बीसाठी आवर्तन सोडले आहे. त्यामुळे हरभरा पेरणीला आणखी वेग आला आहे. हतनूर धरणाचा लाभ रावेर, यावल, चोपडा या तालुक्‍यांना होत आहे, तर अनेरचा लाभ चोपडा तालुक्‍यास आहे. वाघुरमुळे भुसावळ, जळगाव तालुक्‍यातील गावांना लाभ झाला आहे.

वाढत थंडी पिकांसाठी पोषक
जिल्ह्यात थंडी वाढू लागली असून, तिचा लाभ रब्बी पिकांना चांगला होत आहे. पहाटे दवबिंदू पडू लागले आहेत. हरभरा, रब्बी ज्वारी जोमात आहे. चोपडा, जळगाव भागातील काळ्या कसदार जमिनीमधील दादर निसवू लागली आहे.

दादरचा हंगाम यंदा बरा दिसत आहे. कोरडवाहू हरभराही जोमात असून, यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा आहे.
- सुरेश पाटील, शेतकरी, नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव)

इतर ताज्या घडामोडी
चोपडा, जळगावातून केळीचा पुरवठा वाढलाजळगाव ः जिल्ह्यात मागील आठवड्यात केळीच्या दरात...
नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटलनगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...
सोलापुरात भाज्या वधारल्या सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊसनाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव...
इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीजचीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते...
खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब...अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक...
निवडून येण्याची क्षमता असलेल्या...पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार...
पुणे जिल्हा बॅंकेकडून ६४ टक्के पीककर्ज...पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक...
समविचारी पक्षांशी युती करून निवडणूक...भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून...
मराठा आरक्षणासाठी पुण्यात चक्री उपोषण...पुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान...
अतिवृष्टीचा अकोला जिल्ह्यात ३०००...अकोला : गेल्या अाठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा...सातारा   ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
अकोला, वाशीममधील प्रकल्पांतील...अकोला  : कमी पावसामुळे प्रकल्पांमधील...
अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस...नगर   ः जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्...
पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...