परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी

परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता. १३) पर्यंत एकूण ५६ हजार २४३ हेक्टरवर (२०.२८ टक्के) पेरणी झाली आहे. यामध्ये रब्बी ज्वारीची ३४ हजार ३९२ हेक्टर आणि हरभऱ्याची १८ हजार २३३ हेक्टर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या कमी पावसामुळे रब्‍बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत ओलावा नाही. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी ठप्प झाली आहे. ओलितांची सोय असलेले शेतकरी पेरणी करत असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणी क्षेत्रात हळूहळू वाढ होत आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर आहे. पेरणी क्षेत्रामध्ये ज्वारीशिवाय गहू २ हजार ६७२ हेक्टर (८.७७ टक्के), हरभरा १८ हजार २३३ हेक्टर (३४.२३ टक्के), करडई ८९२ हेक्टर (३.५४ टक्के) या प्रमुख पिकांचा समावेश आहे. दुष्काळामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील रब्बी पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे. परंतु पालम आणि सोनपेठ तालुक्यांत पेरणी होऊ न शकल्याने सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक क्षेत्र नापेर राहिले आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पेरणी क्षेत्र

तालुका   सरासरी क्षेत्र    प्रत्यक्षात पेरणी (हेक्टर)  टक्के
परभणी ७४ हजार ३५५, ५ हजार ७५८ ७.७४
जिंतूर   २६ हजार ६६९ ११ हजार ४२५   २.८४
सेलू ३८ हजार ५५८ २० हजार ५४५ ५३.२८
मानवत ९ हजार ७१६  ४ हजार ३६४ ४४.९२
पाथरी  २४ हजार ८४९ २ हजार २९० ९.२२
सोनपेठ    १८ हजार ३१४ ७७१ ४.२१
गंगाखेड   ४३ हजार ७०० ३ हजार १८५  ७.२९
पालम    १९ हजार ३२३ ३०  ०.१६
पूर्णा    २१ हजार ८८३  ७ हजार ८७५ ३५.९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com