agriculture news in Marathi, rabi sowing on 61.8 million hector in India, Maharashtra | Agrowon

रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरा
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

नवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. गेल्या वर्षी ६२.१ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. यंदा ६१.८ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाल्याचे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. गेल्या वर्षी ६२.१ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. यंदा ६१.८ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाल्याचे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

कमी पर्जन्यामुळे आणि पेरणीला झालेला उशीर यामुळे देशातील लागवड क्षेत्रात घट झाली आहे. तसेच भारतीय हवामान खात्यानुसार यंदा मॉन्सून दरवर्षीपेक्षा पाच टक्क्यांनी कमी झाला आहे. तसे पाहिल्यास रब्बी हंगाम प्रत्यक्षपणे पावसावर अवलंबून नसतो. मात्र मॉन्सून चांगला झाल्याने जमिनीत ओल राहते. त्यामुळे रब्बी पिकांना मदत होते.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात गव्हाची लागवड २९.९ दशलक्ष हेक्टरवर झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना हरभरा पिकाला प्राधान्य दिल्याने यंदा गव्हाच्या लागवडीत घट झाली आहे, तर हरभऱ्याची लागवड १०.६ दशलक्ष हेक्टरवर झाली आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अाठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

दुसरीकडे कडधान्य पिकांच्या लागवड क्षेत्रात ४.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारने कडधान्य पिकांना हमीभाव देण्यास सुरू केल्यामुळे कडधान्य लागवडीत वाढ झाली आहे. 

सरकारी धोरणाचा परिणाम
कडधान्य निर्यातीला परवानगी देण्याव्यतिरिक्त सरकारने तुरीवर १० टक्के, पिवळ्या रंगाच्या वाटाण्यावर ५० टक्के तसेच चना आणि मसूरवर प्रत्येकी ३० टक्के आयात शुल्क लावले आहे. इतर प्रमुख पिकांमध्ये मोहरीची पेरणी आधीच पूर्ण झाली आहे. तर तेलबियांची लागवड ६.६ दशलक्ष हेक्टरवर होती, जी मागील वर्षी ७.० दशलक्ष हेक्टर होती. राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा कमी माॅन्सून झाल्यामुळे मोहरीच्या लागवड क्षेत्रात घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

देशातील पेरणी (दशलक्ष हेक्टरमध्ये)

पीक  लागवड क्षेत्र सरासरी क्षेत्र 
तृणधान्य  ५.५    ५.६
मोहरी  ६.७      ७.९
तेलबिया    ७.९    ८.२
ज्वारी    ३.३   ३.१९
मका  १.५७   १.५४
भात  २.२३   १.६
गहू    २.९     १.६
हरभरा     १०.६  ९.८

     

   
 

  
    
    

   
 

इतर अॅग्रो विशेष
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...