agriculture news in marathi, Rabi sowing on 6.5 lakh hectares | Agrowon

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत पावणेसहा लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील सर्वसाधारण ६ लाख ५२ हजार ५५ हेक्‍टरच्या तुलनेत ५ लाख ७५ हजार ९७६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा सर्वसाधारण १ लाख १७ हजार ४२८ हेक्‍टवर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित होती. त्या तुलनेत तीनही जिल्ह्यांत १ लाख ९५ हजार ४७ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील सर्वसाधारण ६ लाख ५२ हजार ५५ हेक्‍टरच्या तुलनेत ५ लाख ७५ हजार ९७६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा सर्वसाधारण १ लाख १७ हजार ४२८ हेक्‍टवर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित होती. त्या तुलनेत तीनही जिल्ह्यांत १ लाख ९५ हजार ४७ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

दुसरीकडे यंदा तीनही जिल्ह्यांत ३ लाख ९२ हजार ९६९ हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी अपेक्षित होती. त्या तुलनेत केवळ ६९ टक्‍के क्षेत्रावर, अर्थात २ लाख ७२ हजार ९९३ हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. तीनही जिल्ह्यांत गव्हाची १ लाख ९ हजार ७५८ हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर सर्वसाधारण क्षेत्राच्या ८० टक्‍के क्षेत्रावर, अर्थात ८८ हजार ६६० हेक्‍टरवरच गव्हाची पेरणी झाली आहे. तीनही जिल्ह्यांत मक्‍याची पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन झाली आहे. यंदा या जिल्ह्यांमध्ये १२ हजार ४६३ हेक्‍टरवर मकाची पेरणी अपेक्षित असताना १५ हजार ३७६ हेक्‍टरवर मकाची पेरणी झाली आहे.

आठ तालुक्‍यांत ज्वारीची पेरणी अधिक
औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील आठ तालुक्‍यांत ज्वारीची सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झालेल्या तालुक्‍यांमध्ये कन्नड, सोयगाव, जालना, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, वडवणी या तालुक्‍यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्‍यांमध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीची पेरणी जालना तालुक्‍यात १८५३० हेक्‍टरवर झाली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्‍यात २८ हजार ६३० हेक्‍टरच्या तुलनेत २८४५० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तर रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ५६,७१० सर्वाधिक असलेल्या आष्टी तालुक्‍यात ४३,३८९ हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.

दहा तालुक्‍यांत सर्वधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी
औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील दहा तालुक्‍यांत यंदा आजवर सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, मंठा, तर बीड जिल्ह्यातील आष्टी, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, वडवणी तालुक्‍यांचा समावेश आहे. अंबाजोगाई तालुक्‍यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अडीच पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...