agriculture news in marathi, rabi sowing area decrease, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात रब्बी पेरणी क्षेत्रात दहा हजार हेक्‍टरने घट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018
सांगली ः जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख २१ हजार ८०६ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. यंदाच्या या हंगामात २ लाख ११ हजार ३३२ हेक्‍टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात १० हजार ४७४ हेक्‍टरने घट झाली आहे; मात्र जत तालुक्‍यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा गव्हाचे क्षेत्र २५५६ हेक्‍टरने वाढले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
सांगली ः जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख २१ हजार ८०६ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. यंदाच्या या हंगामात २ लाख ११ हजार ३३२ हेक्‍टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात १० हजार ४७४ हेक्‍टरने घट झाली आहे; मात्र जत तालुक्‍यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा गव्हाचे क्षेत्र २५५६ हेक्‍टरने वाढले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ६६ हजार ९०७ हेक्‍टर आहे. त्यापैकी २ लाख ११ हजार ३३२ हेक्‍टरवर रब्बीचा पेरा झाला. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता; मात्र जिल्ह्यातील १० हजार ४७४ हेक्‍टरने क्षेत्र कमी झाले असले तरी हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
 
गहू, मका पिकांच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसत नाही. रब्बी ज्वारीची पेरणी १ लाख ३७ हजार ९९८ हेक्‍टरवर झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात पाच टक्‍क्‍यांनी रब्बीच्या क्षेत्रात घट झाली आहे.

मिरज, जत, कवठे महांकाळ तालुक्‍यात करडईचे पीक घेतले जाते. या तालुक्‍यात जरी करडईचे पीक घेतले जात असले तरी जत तालुक्‍यात करडईचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या वर्षी जत तालुक्‍यात करडईचे क्षेत्र ४३५ हेक्‍टर होते. यंदाच्या हंगामात करडईचा पेरा ३६२ हेक्‍टरवर झाला असून, त्यात ७३ हेक्‍टरने घट झाली आहे.

तालुकानिहाय रब्बीतील अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्‍टर)
लुका क्षेत्र
मिरज २५ हजार ६६६
जत ७८ हजार ४११
खानापूर १० हजार ५५१
वाळवा १४ हजार ५३६
तासगाव १० हजार ४९४
शिराळा ५ हजार ७०८
आटपाडी २४ हजार २३५
कवठेमहांकाळ २२ हजार ६२१
कडेगाव १० हजार ५८०
पलूस ८ हजार २३०.

 

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...