agriculture news in Marathi, rabi sowing below 50 percent in Akola District, Maharashta | Agrowon

अकोला जिल्ह्यात रब्बी पेरणी ५० टक्क्‍यांच्या अातच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

अकोला ः विविध संकटांना सामोरे जात असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून फारशा अपेक्षा उरलेल्या नाहीत. रब्बी पेरण्यांचा काळ संपत अालेला असताना जिल्ह्याचे रब्बी क्षेत्र अातापर्यंत जेमतेम ५० टक्क्यांपर्यंतही पोचू शकलेले नाही.

जिल्ह्यात सर्व पिके मिळून ४२ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड होऊ शकली अाहे. यात सर्वाधिक ४६ हजार ८८१ हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र अाहे. हे क्षेत्रही लक्ष्यांक असलेल्या एक लाख २२०० हेक्टरच्या तुलनेत ६६.४ टक्के एवढेच अाहे.

अकोला ः विविध संकटांना सामोरे जात असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून फारशा अपेक्षा उरलेल्या नाहीत. रब्बी पेरण्यांचा काळ संपत अालेला असताना जिल्ह्याचे रब्बी क्षेत्र अातापर्यंत जेमतेम ५० टक्क्यांपर्यंतही पोचू शकलेले नाही.

जिल्ह्यात सर्व पिके मिळून ४२ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड होऊ शकली अाहे. यात सर्वाधिक ४६ हजार ८८१ हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र अाहे. हे क्षेत्रही लक्ष्यांक असलेल्या एक लाख २२०० हेक्टरच्या तुलनेत ६६.४ टक्के एवढेच अाहे.

या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ३० हेक्टरचे नियोजन तयार करण्यात अाले होते. प्रत्यक्षात अातापर्यंत ४९ हजार ४०० हेक्टरवर पेरण्या होऊ शकलेल्या अाहेत. जिल्ह्यात दरवर्षी हरभऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. हे क्षेत्र शेतकऱ्यांना रब्बीमध्ये दिलासा देऊन जाते. गव्हाच्या लागवडीतही अशीच प्रचंड घट अालेली अाहे. अवघी दोन हजार हेक्टरपर्यंत कशीबशी लागवड पोचली.

या वर्षी खरिपातील पिकांची उत्पादकता जेमतेम राहिल्याने किमान रब्बीत ही तूट भरून निघेल या उद्देशाने शेतकरी अपेक्षा लावून होते. मात्र रब्बी पिकांची लागवडच लक्ष्यांकापर्यंतही पोचलेली नाही.

रब्बी लागवडीसाठी दिवसेंदिवस अोल कमी होत गेल्याने तसेच प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी इच्छा असून पेरणी केली नाही. तसेच रब्बी लागवडी न होण्यास पैसा हेसुद्धा कारण ठरले अाहे.

खरीप पीक अाले नाही. पीककर्जही या मोसमात भेटलेले नसल्याने अाधीच शेतकरी अडचणीत अालेला होता. अनेकांजवळ लागवडीसाठी पैशांची उपलब्धता नव्हती. यामुळे रब्बी पिकांच्या लागवडीवर परिणाम झाल्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात अाहे. अजून पंधरा दिवसांत अाणखी लागवड झाली तरी हे क्षेत्र ५५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नसल्याची शक्यता व्यक्त होत अाहे.
 

पीक     लक्ष्यांक    

प्रत्यक्ष लागवड
(हेक्टरमध्ये)  

हरभरा     १,०२,२००     ४६,८८१
गहू     ३१,३००     २०८०
ज्वारी     १४३०     ०.५
कांदा     ३०००     ११५

 

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप...राज्यातील शेतकरीवर्गाच्या उत्पन्नवाढीचा...
जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा...देशात हरितक्रांती अत्यावश्यक होती. मात्र, ...
निर्यातक्षम मोसंबीसाठी एकच बहर घ्यावा...जालना :  निर्यातक्षम मोसंबी उत्पादनासाठी...
सुबोध सावजींचा विहिरीतच मुक्कामअकोला ः पाणीपुरवठा योजनांच्या कामात मोठ्या...
साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा...लातूर ः केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना...
जागेवरच कुजवा सेंद्रिय घटकमी १९७० मध्ये कोल्हापूरमध्ये शेती करण्यास प्रारंभ...
धोरणकर्त्यांना शेतमाल उत्पादकांपेक्षा...बारामती, जि. पुणे : देशातील धोरणकर्त्यांना शेतमाल...
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
पिंक बेरी, भुरी, क्रॅकिंग टाळण्यासाठी...सध्याच्या वाातावरणामध्ये द्राक्ष बागेमध्ये पिंक...
तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे...सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत...
खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूचजळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अजूनही कांदा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’...मार्केट ट्रेंडस्.. आर. बी. हर्बल अॅग्रो ही...
ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारकपुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारतेय ऊसशेतीसिंधुदुर्ग : आंबा, काजू व अन्य मसाला पीक...
मुख्यमंत्री शाळा बंद करताहेत : अजित पवारबीड : सरकार मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र...
माजी राज्यमंत्र्यांचे विहिरीत आंदोलनअकोला : बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील...
शासकीय निधी खर्चाची माहिती आता एका क्‍...रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा...
जळगावात चवळी शेंगा २००० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...