औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत पेरणीचा टक्‍का निम्म्यापुढे सरकला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत सर्वसाधारण ६ लाख ५२ हजार हेक्‍टरच्या तुलनेत पेरणीचा टक्‍का निम्म्यापुढे सरकला आहे. ३ लाख ६२ हजार ७०९ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली असून, यामध्ये २ लाख ७ हजार हेक्‍टरवरील रब्बी ज्वारी, तर १ लाख १५ हजार हेक्‍टरवरील हरभरा पेरणीचा समावेश आहे. 

यंदाच्या निराशाजनक खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांच्या सर्व आशा आता रब्बीवर आहेत. सुरवातीला संथगतीने सुरू असलेल्या रब्बीच्या पेरणीने आता वेग घेतला आहे. पेरणीचा टक्‍का नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याअखेर ५५ टक्‍क्‍यांच्या पुढे सरकला असून, शेतशिवारातील हालचालींनी वेग घेतला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण ९१ हजार हेक्‍टरच्या तुलनेत २९ हजार हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. जालना जिल्ह्यात सर्वसाधारण एक लाख हेक्‍टरच्या तुलनेत ६६ हजार हेक्‍टरवर, तर बीड जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख हेक्‍टरच्या तुलनेत १ लाख ११ हजार हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.

मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र १२ हजार ४६३ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत ८ हजार ६२० हेक्‍टरवर मक्याची पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २९५६ हेक्‍टर, जालना जिल्ह्यातील २२१० हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील ३४५४ हेक्‍टरवरील मका पेरणीचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यांत सर्वसाधारण १ लाख १७ हजार ४२८ हेक्‍टर हरभऱ्याचे क्षेत्र आहे. त्या तुलनेत १ लाख १५ हजार २१ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

हरभऱ्याची पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २३ हजार ७८ हेक्‍टर, जालना जिल्ह्यातील २५ हजार ८५६ हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील ६६ हजार ८७ हेक्‍टरवरील हरभऱ्याची पेरणी झालेल्या क्षेत्राचा समावेश आहे.

औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत यंदा सूर्यफुलाचे ४२७४ हेक्‍टर क्षेत्र गृहीत होते. त्या तुलनेत केवळ ४५ हेक्‍टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या सूर्यफुलाचे  ३३ हेक्‍टर क्षेत्र बीड जिल्ह्यातील बीड व आष्टी तालुक्‍यांत असून, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यात १२ हेक्‍टरवर सूर्यफुलाची पेरणी झाल्याचे कृषी विभागाचे आकडे सांगतात.

२८ हजार हेक्‍टरवर गहू औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा सर्वसाधारणपणे १ लाख ९ हजार ७५८ हेक्‍टर गव्हाचे क्षेत्र गृहीत आहे. त्या तुलनेत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याअखेर २६ टक्‍के क्षेत्रावर अर्थात २८ हजार ८४५ हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ५१९ हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली असून, त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात ८ हजार ५८२ हेक्‍टरवर, तर बीड जिल्ह्यात ८ हजार ७४४ हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

दहा तालुक्‍यांची हरभरा पेरणीत आघाडी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील नऊ तालुक्‍यांनी हरभऱ्याच्या पेरणीत आघाडी घेतली आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्‍यात सर्वाधिक २२ हजार ७९२ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ केज तालुक्‍यात ११ हजार ५९० हेक्‍टरवर हरभरा पेरला गेला आहे. माजलगाव व मंठा तालुक्‍यांत ८ हजार हेक्‍टरपेक्षा जास्त, आष्टी, बीड तालुक्‍यांत सहा हजार हेक्‍टरपेक्षा जास्त तर गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, परळी तालुक्‍यांत चार हजार हेक्‍टरच्याही पुढे हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com