सांगली जिल्ह्यातील रब्बी पेरणी ७८ टक्क्यांवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली : जिल्ह्यातील रब्बी पेरणी अंतिम टप्प्यात आली असून, ७८ टक्के पेरा झाला आहे. मक्‍याची पेरणी १९ हजार ०१७ तर हरभऱ्याची पेरणी २६ हजार ८११ हेक्‍टरवर झाली आहे. मका आणि हरभरा या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ६६ हजार ९०७ हेक्‍टर असून, त्यापैकी २ लाख ७ हजार २८४ हेक्‍टरवर पेरणी झाली. परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात ५ टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता असून, जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी रब्बी ज्वारीची झाली आहे.

जत तालुक्‍यात गहू, हरभरा, ज्वारीचा पेरा अधिक जत तालुक्‍यात परतीच्या पावसामुळे यामुळे रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारीचे क्षेत्र वाढणार असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार तालुक्‍यात रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी ज्वारीचा ५९ हजार ६२० हेक्‍टरवर पेरा झाला आहे. जत तालुक्‍यात मक्‍याची पेरणी ७ हजार ६३७, तर गव्हाची पेरणी ५ हजार ४६६ हेक्‍टर वर पोचली आहे. तालुक्‍यात हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

गळीत पिकांच्या क्षेत्रात घट जिल्ह्यात गळीत पिकामध्ये सूर्यफूल, करडई ही पिके घेतली जातात. परंतु या पिकांसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि पीक प्रात्यक्षिक मिळत नाही. यामुळे या पिकाच्या क्षेत्रात दरवर्षी घट होत असल्याचे चित्र आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com