agriculture news in marathi, Rabi wheat, gram area is likely to increase | Agrowon

रब्बीत गहू, हरभरा क्षेत्र वाढण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

अकोला : या मोसमात विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच पश्चिम महाराष्ट्रात अातापर्यंत चांगला पाऊस झाल्याने रब्बीचे क्षेत्र वाढीची शक्यता अाहे. ही बाब लक्षात घेऊन महाबीज या प्रमुख बियाणे पुरवठा महामंडळाने बियाण्याचे ३ लाख ८२ हजार २३० क्विंटलचे नियोजन केले अाहे. प्रामुख्याने गहू व हरभरा लागवडीतील वाढ पाहून बियाणे पुरवठ्याचे नियोजन केल्याची माहिती महाबीजच्या सूत्रांनी दिली.

अकोला : या मोसमात विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच पश्चिम महाराष्ट्रात अातापर्यंत चांगला पाऊस झाल्याने रब्बीचे क्षेत्र वाढीची शक्यता अाहे. ही बाब लक्षात घेऊन महाबीज या प्रमुख बियाणे पुरवठा महामंडळाने बियाण्याचे ३ लाख ८२ हजार २३० क्विंटलचे नियोजन केले अाहे. प्रामुख्याने गहू व हरभरा लागवडीतील वाढ पाहून बियाणे पुरवठ्याचे नियोजन केल्याची माहिती महाबीजच्या सूत्रांनी दिली.

खरिपाप्रमाणेच महाराष्ट्रात रब्बी हंगामसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. यात प्रामुख्याने हरभरा हा सर्वाधिक क्षेत्रावर पेरला जातो. रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई ही चार मुख्ये पिके घेतली जातात. गोकूळ अष्टमीपासून अनेकजण रब्बी ज्वारी लागवडीचा हंगाम साधतात. यामुळे महाबीजकडून नियोजित २४ हजार ३०९ क्विंटलपैकी रब्बी ज्वारीचे ५० ते ६० टक्के बियाणे यापूर्वीच बाजारात पुरविण्यात अाले अाहे.

रब्बीत हरभरा १५ ते १६ लाख हेक्टरवर लावला जातो. यावर्षी धरणात साठासुद्धा उपलब्ध झालेला अाहे. राज्यात हरभऱ्याचे चार लाख २० हजार क्विंटल बियाणे हवे अाहे. यात महाबीज दोन लाख ३१ हजार क्विंटल, राष्ट्रीय बीज निगम ३७ हजार ५०० क्विटंल अाणि खासगी कंपन्या १ लाख ५२ हजार ५०० क्विंटलचा पुरवठा करतील. महाबीजकडून गव्हाचे ८१ हजार, करडईचे ७०३ क्विंटल बियाणे पुरविले जाणार अाहे.

राष्‍ट्रीय अन्न सुरक्षा योजना या हंगामासाठी राज्यातील २६ जिल्ह्यात राबवली जात अाहे. या जिल्ह्यांतील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना १० वर्षातील बियाण्यांसाठी अनुदानाचा लाभ मिळणार अाहे. महाबीज जॅकी ९२१८, दिग्विजय, विजय, अाकाश, विराट, विशाल यासह नवीन वाण असलेला रामविजय वाण पुरवित अाहे. गव्हासाठी योजनेत नागपूर, बीड, सोलापूर हेच तीन जिल्हे असल्याने तेथील शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकेल.     

   हरभऱ्याचे उच्चांकी नियोजन
हरभरा बियाण्याचे यंदा ३० हजार क्विंटलचे वाढीव नियोजन करून महाबीजने हा पुरवठा दोन लाख ३१ हजार क्विंटलपर्यंत नेला अाहे. अाजवरचा हा उच्चांक ठरला असल्याची माहिती विपणन महाव्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी दिली. गव्हाचा पेरासुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी ८१ हजार क्विंटलचे नियोजन असले तरी वाढीव मागणी अाल्यास अाणखी ३० ते ४० हजार क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करून देण्यास सक्षम असल्याचे नाके यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...