कॉँग्रेस नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते ः विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील

नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते पक्षाला मजबूत करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते. त्यांच्या भरवशावर असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते केव्हाच दुरावले. मला या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते. राज्यातील या नेत्यांनी आत्मचिंतन वगैरे करण्याची आवश्‍यकता नाही. कारण लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले आहे, अशा शब्दांत भाजपच्या वाटेवर असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉँग्रेस नेत्यांवर टीका केली. 

विखे पाटील यांनी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शिर्डी येथे श्री साई समाधीचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी लॉज-हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष विलास (आबा) कोते, युवा नेते ताराचंद कोते, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर व दत्तात्रेय डांगे उपस्थित होते.

भाजपमध्ये जाण्याचे आणि मंत्रिपदाचे संकेत  जनतेच्या भावनेचा आदर करून आपण यापुढील निर्णय घेऊ, असे सूचक विधान करून विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे स्पष्ट संकेत पुन्हा दिले. एका दूरचित्रवाणी वाहिनीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, "पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री होतील,'' असे विधान केले होते. त्याला दुजोरा देणारे विधान शनिवारी विखे पाटील यांनी शिर्डी भेटीत केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com