agriculture news in marathi, radhamohan singh said, 51 thousand crore rupees need for dairy development, Maharashtra | Agrowon

‘डेअरी’साठी ५१ हजार कोटी गुंतवणुकीची गरज ः राधामोहनसिंह
वृत्तसेवा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

देशातील डेअरी उद्योगाच्या विकासासाठी जवळपास ५२ हजार कोटी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. या माध्यामातून ५० हजार गावांतील ९५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच, अनेक कामगारांना रोजगारदेखील उपलब्ध होईल.
- राधामोहनसिंह, केंद्रीय कृषिमंत्री

नवी दिल्ली ः केंद्राने देशातील दूध उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दूध उत्पादन वाढविण्यासाठी डेअरी उद्योगासाठी केंद्राने ‘राष्ट्रीय डेअरी कृती आराखडा-२०२२’ जाहीर केला होता. हा कृती आराखडा राबविण्यासाठी केंद्र सरकारला ५१ हजार ०७७ कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी सांगितले. 

मंत्री राधामोहन सिंह यांनी डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधीसाठी १० हजार ८८१ कोटींची तरतूद केली आहे. नुकतेच त्यापैकी पहिला हप्ता  ४४० कोटींचा चेक राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाकडे सुपूर्द केला आहे.

‘‘डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधीच्या माध्यमातून देशातील ५० हजार गावांतील ९५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच प्रशिक्षित, अर्ध प्रशिक्षित आणि अशिक्षित अशा अनेक कामगारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे’’, असे श्री. सिंह यांनी सांगितले. 

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. भारतात दरवर्षी १७६.३५ दशलक्ष टन दूध उत्पादन होते. ‘राष्ट्रीय डेअरी कृती आराखडा-२०२२’ अंतर्गत देशातील दूध उत्पादन २५४.५ दशलक्ष टन करण्याचे उद्दीष्ट आहे. ‘‘डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधीच्या माध्यमातून देशातील दूध प्रक्रिया क्षमतेत वाढ करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे अतिरिक्त १२६ लाख लिटर दूध प्रक्रियेची क्षमता निर्माण होणार आहे. तसचे दूध ड्राइंग क्षमता २१० दशलक्ष टन प्रतिदिवस आणि १४० लाख टन दूध चिलिंगची क्षमता निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले. 

नाबार्ड करणार वितरण
देशातील व्यवहार्य काम करणारे दूध संघ आणि डेअरी फेडरेशनला राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळ आणि राष्ट्रीय सरकार विकास कार्पोरेशनच्या माध्यमातून निधी मिळू शकेल. या अंतर्गत ८ हजार कोटी निधीचे १० वर्षांसाठी वाटप नाबार्ड ६.५ टक्के व्याज दराने करणार आहे. २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षीच्या काळात डेअरी उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक व्हावी यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे. तसेच सरकारही व्याज सवलत योजना लागू करण्याच्या विचारात आहे, असे नाबार्डने सांगितले.

१५ प्रकल्पांसाठी आठ हजार कोटी
डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधीअंतर्गत नाबर्डने हरियाना, पंजाब आणि कर्नाटक या राज्यांमध्ये १ हजार १४८.५८ कोटी रुपयांचे १५ प्रकल्प उभारण्यासाठी ८४३.८१ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या वर्षीच्या शेवटपर्यंत ३ हजार ८०० कोटींचा निधी मंजूर करण्याची शक्यता आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...