agriculture news in Marathi, Radhamohan singh says government will train youth for farm employment, Maharashtra | Agrowon

शेती क्षेत्रातील रोजगारासाठी युवकांना प्रशिक्षण देणार : राधामोहनसिंह
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नवी दिल्ली ः शेती क्षेत्रातील कुशल कामगारांची समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील कामांचे युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी कृषी मंत्रालयाने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयासोबत सामंजस्य करार केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. 

नवी दिल्ली ः शेती क्षेत्रातील कुशल कामगारांची समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील कामांचे युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी कृषी मंत्रालयाने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयासोबत सामंजस्य करार केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. 

कृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, की युवकांना शेती व संलग्न क्षेत्रासंबंधी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण कार्यक्रम हे देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये नियमित स्वरूपात चालतील. यातून युवकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल. सध्या अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम देशातील कृषी विज्ञान केंद्रांध्ये सुरू आहेत. हे कार्यक्रम येणाऱ्या काळात गतिमान केले जातील. तसेच सरकार उत्पादकता वाढ, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव देणे, शेतीतील धोके कमी करणे आणि शेतीविकासातील इतर पैलूंचे मजबुतीकरण करणे यावर सरकार काम करत आहे. 

‘‘तसेच २०१७-१८ मध्ये २३२० युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी ११६ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा फायदा निश्चितच या युवकांना झाला आहे, तसेच स्वयंरोजगाराचे प्रमाणही वाढण्याची गरज आहे आणि कृषी कौशल्य परिषदेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील कौशल्य उणिवा किंवा अंतराचे विश्लेषण होणे गरजेचे आहे,’’ असेही ते म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...