राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले
राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारी साडेबाराला 3 नंबर व 6 नंबरचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे.

या दोन्ही दरवाजांतून अनुक्रमे 2200 व 2856 असा एकूण 5056 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत होत आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर झपाट्याने वाढ होणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील समृध्दी वाढविण्यासाठी कारणीभूत असणारे राधानगरी धरण आज पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तुळशी, कडवी, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे हे तीन लघु पाटबंधारे पूर्ण भरले आहेत. 

आज दुपारी 1.30 पर्यंतचा धरणातील सध्याचा आणि कंसात एकूण पाणीसाठा क्षमता: 

  • राधागरी - 8.36 (8.36 टीएमसी),
  • वारणा 33.88 (34.399),
  • दुधगंगा 22.71 (25.393),
  • तुळशी 3.47 (3.47 टीएमसी)
  • 'राधानगरी धरण भरले आहे. दोन स्वंयचलित दरवाजे उघडले आहेत. पाण्याचा विसर्ग वाढला असून नदीपात्रातील पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे', अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com