agriculture news in marathi, Radheshyam Moppal again joined the MSRDC | Agrowon

राधेश्याम मोपलवार पुन्हा `एमएसआरडीसी`त रुजू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबई : बोरिवली येथील भूखंडाची स्वस्त दरात विक्री आणि सतीश मांगले यास धमकाविल्याप्रकरणी एमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असताना, त्या कालावधीची रजा गृहीत धरून त्यांना पुन्हा आपल्या मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बजावले आहेत.

मुंबई : बोरिवली येथील भूखंडाची स्वस्त दरात विक्री आणि सतीश मांगले यास धमकाविल्याप्रकरणी एमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असताना, त्या कालावधीची रजा गृहीत धरून त्यांना पुन्हा आपल्या मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बजावले आहेत.

पावसाळी अधिवेशनाच्या काळात बोरिवलीतील भूखंड स्वस्त दरात विकण्यासंदर्भात मोबाईलवरील संभाषण आणि बांधकाम व्यावसायिक सतीश मांगले यास धमकाविल्याप्रकरणाचे मोपलवार यांचे संभाषण उघडकीस आले. त्यामुळे विधिमंडळात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यावरून अखेर मोपलवार यांना एमएसआरडीसी आणि समृद्धी महामार्गाच्या प्रमुख पदावरून दूर करण्याचा निर्णय घेत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. मात्र त्यांचा हा पदावरून दूर राहण्याचा १४५ दिवसांचा कालावधी रजेचा कालावधी मानून सामान्य प्रशासन विभागाने मोपलवार यांची रजा मंजूर करत त्यांना २७ डिसेंबर २०१७ रोजीपासून पुन्हा मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश जारी केले आहेत.

सामान्य प्रशासनाच्या या आदेशामुळे मोपलवार यांना त्या दोन्ही प्रकरणांत क्लीन चिट मिळाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळेच त्यांना एमएसआरडीसीच्या उपाध्यक्षपदी रुजू होण्यास सांगितल्याची माहिती समजते.

मोपलवार यांना पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पास चालना व गती मिळणार असल्याची चर्चा आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...