agriculture news in marathi, radish rate increase, dhule, maharashtra | Agrowon

धुळ्यातील मुळ्याला परराज्यातून मागणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018
सध्या मुळ्याला मागणी वाढली आहे. सुरत व इंदूरच्या बाजारात आमच्या भागातील शेतकरी मुळा विक्रीसाठी नेत असून, खर्च वजा करता बऱ्यापैकी नफा सुटत आहे. यंदा सूक्ष्मसिंचनामुळे पीकही बरे दिसत आहे. 
- महेंद्र पाटील, शेतकरी, कापडणे, ता. जि. धुळे.
धुळे  : जिल्ह्यातील न्याहळोद व परिसरातील मुळ्याला मागील पंधरवड्याच्या तुलनेत सध्या किलोमागे चार रुपये अधिक दर आहे. इंदूरसह सुरत येथील बाजारातून मुळ्याला मागणी असून, शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल, असे चित्र आहे. 
 
मागील महिन्यात मुळ्याचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने मुळा पशुधनाला चारा म्हणून देण्याची वेळ आली. तर काही शेतकऱ्यांनी मुळा बाजारात नेण्याऐवजी फेकून दिला. १७ फेब्रुवारीपासून दरवाढ सुरू झाली. सध्या आठ रुपये प्रतिकिलो असा दर मुळ्याला मिळत आहे. अल्प का असेना, काहीशी दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसू लागले आहे. 
 
जिल्ह्यात धुळे तालुका मुळा उत्पादनात आघाडीवर आहे. कापडणे, देवभाने, सरवड, न्याहळोद, कौठळ, धमाणे, नगाव, नंदाणे, सायने, सोनगीर, मुकटी, जापी, शिरडाणे भागात मुळ्याचे मोठ्या क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाळा कमी असतानाही शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचन यंत्रणेच्या आधारे मुळ्याची लागवड केली होती.
 
मुळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यंदा होत आहे. या भागातील शेतकरी मिळून सुरत व इंदूरच्या बाजारात मुळा पाठवित आहेत. वाहतूक भाडे व इतर खर्च वजा करता मुळ्याला दर बऱ्यापैकी मिळत असल्याचे शेतकरी दिनेश बडगुजर (कापडणे, ता. धुळे) म्हणाले. 
 
मुळ्यासह शेवगा शेंगांनाही मागणी आहे. प्रतिक्विंटल ५००० रुपयांपर्यंत दर सुरतच्या बाजारात आहे. काही शेतकरी आठवड्यातून एकदा शेवगा सुरतला नेत असून, पुढे बॉक्‍समध्ये पॅकिंग करून शेवग्याची पाठवणूक करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...