त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
अॅग्रो विशेष
पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता पथकाचे प्रमुख रफिक नाईकवाडी यांची बदली झाली आहे. कृषी खात्यातील बहुचर्चित मृदसंधारण घोटाळ्याचा तपास सध्या ते करीत होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या मुंबई मुख्यालयात 'कृषी व्यवसाय तज्ञ' म्हणून ते यापुढे काम बघतील. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी वापरला जात आहे.

'सातारा जिल्ह्यात झालेल्या मृदसंधारण घोटाळ्यासह इतर विदर्भ व मराठवाड्यातील विविध गैरव्यवहाराची चौकशी श्री. नाईकवाडी करीत होते. मात्र, ही बदली गैरव्यवहारात गुंतलेल्या कंपूच्या दबावामुळे झालेली नसून त्यांनीच राज्य शासनाला बदलीची विनंती केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते स्वतःच बदलीच्या प्रयत्नात होते, अशी माहिती आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
दक्षता पथकात अधीक्षक कृषी अधिकारी दर्जावर श्री. नाईकवाडी यांनी केलेल्या चांगल्या कामकाजामुळे कृषी खात्याने अनेक प्रकरणांमध्ये गैरव्यवहारातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. सातारा जिल्ह्यातील मृदसंधारण कामाच्या तक्रारींचा तपास करण्याची जबाबदारी तत्कालीन कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी श्री. नाईकवाडी यांच्यावर सोपविली होती.
मृदसंधारण कामाची चौकशी मर्यादित ठेवण्यासाठी दबाव असतानाही विद्यमान कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी देखील श्री. नाईकवाडी यांच्याकडेच चौकशीची सूत्रे ठेवली होती. 'श्री. नाईकवाडी यांच्या बदलीनंतर विविध घोटाळ्यांच्या चौकशी कामकाजाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांची बदली करताना दक्षता पथकाला दुसरा भक्कम अधिकारी देण्यात आलेला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
गुणनियंत्रणची सूत्रे काटकर यांच्याकडे
राज्याच्या कृषी खात्यातील गुणनियंत्रण कामकाजात सर्वात महत्त्वाचे पद असलेल्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदाची सूत्रे आता सुभाष काटकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून श्री. काटकर काम पहात होते. पुण्याचे अधीक्षक म्हणून आता बाळासाहेब पडघलमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- 1 of 287
- ››