अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा

अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा

नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे. पराभवानंतर चार लाख कोटी कर्जमाफ करण्याचे पुन्हा एकदा अामिष दाखवत आहे. शेतकरी वाचवण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही, मात्र त्यात सरकारने त्यात अटीशर्ती घालू नये, अन्यथा पुन्हा घोषणा होऊन फसवणूक होऊ शकते, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. चार लाख कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याच्या विषयाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीरामपूर (जि. नगर) येथे जाताना नगरमध्ये रघुनाथदाना पाटील म्हणाले, ‘‘त्यामुळे कर्ज वाढत असल्याचे शरद जोशी, सी. रंगराजनसारख्या अर्थशास्त्रांनी अनेक वेळा सांगितले होते. हे सगळे होऊनही सरकामध्ये काम करणारे लोक शेतकरी आत्महत्या कशाने होतात, शेतकरी कर्जबाजारी होण्याचे कारण काय, हे पाहत नाहीत. कर्ज हे शेतीमाल दर आणि आयात निर्यात धोरणाशी निगडित आहे.’’ शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले म्हणून आधीच्या सरकारला फटका बसला, मात्र हवेत असलेल्या भाजप सरकारनेही तसेच केले. जेव्हा चार राज्यांतील निवडणुकीत फटका बसला, तेव्हा मात्र ‘शेतकरी असंतुष्ट असला तर कोणालाही राज्य करता येणार नाही’ ही बाब जेव्हा लक्षात आली. तेव्हा पुन्हा एकदा देशात चार लाख कोटी रुपयाचे कर्ज माफ करण्याची घोषणा करून शेतकऱ्यांची मते घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे. कर्ज शेतीमालाच्या दरांशी निगडित आहे आणि शेतीमालाचे दर हे आयात-निर्यातीवर अवलंबून असतात. सरकार बाहेरून कांदा, तूर, तेल आयात करतेय, येथील शेतीमालाचे दर पाडण्याचाच प्रयत्न झाला. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे हे कर्ज संपूर्णपणे माफ करण्याशिवाय सरकारपुढे पर्यायच नाही. मात्र आता नव्याने कर्जमाफी करताना त्यात अटीशर्ती घालू नयेत. कारण महाराष्ट्रात सरकारने कर्जमाफी केली, पण त्याचा सरकारला फायदा होण्याएवजी तोटाच झाला आणि शेतकऱ्यांनाही मनस्ताप झाला. त्यातून फक्त बॅंकांचे अडकलेले पैसे मोकळे झाले. खात्यावरील बाकी कमी होते, पण हातात काहीच मिळत नाही. नवीन कर्ज काढून फेडायचे असेल तर त्यासाठी व्यवसाय नफ्यात पाहिजे. शेतमालाला दरच मिळत नाही तर शेती व्यवसाय नफ्यात कसा येणार, असा प्रश्‍न उपस्थित करत सरकारने आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवण्याच्या भानगडीत पडू नये, नाही तर चार राज्यांत जे झाले ते देशभरात होईल.'''' या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले उपस्थित होते. शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा कुटिल डाव रघुनाथदादा पाटील म्हणाले, "राज्यात कर्जमाफी दिली; पण त्यात पाच एकराच्या खालील शेतकऱ्यांना सवलत दिली. मुळात पाच एकराच्या खालील शेतकऱ्यांना आणि पाच एकरावरील शेतकऱ्यांना खते, बियाणे औधषे व अन्य बाबीला वेगळा दर नव्हता. पण दोन गट पाडून सरकार शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा कुटिल डाव आधीच्या सरकारने प्रयत्न केला. तेच हे सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. असे अनेक वेळा झाले आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते.''''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com