agriculture news in Marathi, Raghunathadad urged to fight in the south of the city | Agrowon

नगर दक्षिणमधून लढण्याचा रघुनाथदादांना आग्रह
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

नगर : राज्याच्या राजकारणात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू झाला आहे. बुधवारी नगरला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत याबाबत एकमुखी मागणी झाली. त्यामुळे विखे, पवारांमुळे चर्चेत राहिलेला या मतदारसंघात नव्या चर्चेचा सूर मिसळू लागला आहे. रघुनाथदादा पाटील याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

नगर : राज्याच्या राजकारणात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू झाला आहे. बुधवारी नगरला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत याबाबत एकमुखी मागणी झाली. त्यामुळे विखे, पवारांमुळे चर्चेत राहिलेला या मतदारसंघात नव्या चर्चेचा सूर मिसळू लागला आहे. रघुनाथदादा पाटील याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात १९९१ साली माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्यात लढत झाली होती. त्यावेळचे निवडणूक प्रकरण न्यायालयात गेले होते. त्याच निवडणुकीपासून निवडणूक अचारसंहिता लागू झाली. त्यामुळे २८ वर्षानंतरही विखे-गडाख लढतीचे किस्से लोक सांगतात. यंदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादीने जागा सोडली नाही, त्यामुळे सुजय विखेंना भाजपात जावे लागले. गेल्या महिनाभरापासून हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत आहे.  

आता या मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होऊ लागला आहे. नगर येथे झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय महाराज बारस्कर, आम आदमी पार्टीचे राजाभाऊ आघाव, शेतकरी युवा आघाडीचे बच्चू मोढवे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम, जिल्हा कार्याध्यक्ष अहमदभाई जहागीरदार, कैलास पाटील, मनोज हेलवडे, बाळासाहेब कदम, अनिल भापकर यांच्यासह कार्यकर्यांनी त्यांना आग्रह केला.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...