agriculture news in marathi, raghunathdada patil demand for stop milk adulteration, pune, maharashtra | Agrowon

राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत : रघुनाथदादा पाटील
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न व औषध प्रशासन विभाग, दुग्धविकास विभाग आणि कायदेदेखील राज्यकर्त्यांच्या हातात असताना भेसळ का थांबविली जात नाही, असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला.

पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न व औषध प्रशासन विभाग, दुग्धविकास विभाग आणि कायदेदेखील राज्यकर्त्यांच्या हातात असताना भेसळ का थांबविली जात नाही, असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला.

वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, की दूध भेसळीचा फटका ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसतो आहे. भेसळीसाठी जनावरे आणि शेतकरीदेखील दोषी नाहीत. १५ कोटी लिटर दूधपुरवठा क्षमता असताना देशात मात्र ६४ कोटी लिटर दुधाचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे ४९ कोटी लिटर दूध भेसळीचे असल्याचे सिद्ध होते. हा व्यवसाय मुळात आमदार, खासदारांचा आहे. दूध व विषयुक्त अन्न पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असताना सरकार गप्प बसले आहे.

वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा जाणकार लोकांनी तयार केलेला नाही. वन्यजीवांची संख्या वाढत असून, शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत. त्यातून शहरांकडे स्थलांतर होत आहे. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळेदेखील जनावरांची विक्री होत नाही. त्यामुळे दोन्ही कायदे रद्द करावेत. एका बाजूला चारा नाही, दुसऱ्या बाजूला दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी, असेच सरकारला वाटते आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

‘जलयुक्त शिवारा’ची टिमकी वाजविण्यासाठी राज्यातील पश्चिमेचे पाणी पूर्वेला जाण्याचा अहवाल आम्ही दिला आहे. त्यावर सरकारने काम करावे. शेतकऱ्यांना कोंडी करून मारणारी नीती सरकारने अवलंबिली आहे. शेतकरी आत्महत्या नसून, ते सरकारकडून केले जाणारे खून आहेत, अशी कडक शब्दांत टीका देखील त्यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...