agriculture news in marathi, Raghunathdada Patil demands take action against sugar factories not giving FRP | Agrowon

थकीत ‘एफआरपी’ची रक्कम तत्काळ द्या : रघुनाथदादा
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जानेवारी 2018

पुणे : थकीत एफआरपीची रक्कम तत्काळ देणे, को २६५ वाणाबाबत साखर कारखाने ऊसदर कराराचा भंग, अंतरानुसार ऊस वाहतूक कपात करणे आणि दोन कारखान्यांतील हवाई अंतराची अट रद्द करणे अशा विविध मागण्या साखर आयुक्त यांनी तत्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.

पुणे : थकीत एफआरपीची रक्कम तत्काळ देणे, को २६५ वाणाबाबत साखर कारखाने ऊसदर कराराचा भंग, अंतरानुसार ऊस वाहतूक कपात करणे आणि दोन कारखान्यांतील हवाई अंतराची अट रद्द करणे अशा विविध मागण्या साखर आयुक्त यांनी तत्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.

या संदर्भात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी (ता. १७) साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी भेट घेतली. या वेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, प्रदेशाअध्यक्ष बाळासाहेब पटारे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की साखर कारखाने सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरी अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे रक्कम अदा केलेली नाही. उसाचा पहिला हप्ता एकरकमी चौदा दिवसांत देणे हे कायदेशीर बंधन आहे. परंतु २०१७-१८ च्या हंगामात ठरल्याप्रमाणे ९.५ टक्के उताऱ्याला २५५० रुपये प्रमाणे अनेक साखर कारखान्यांनी पहिला हप्ता दिला नाही. अशा कारखान्यांविरुद्ध कारदेशीर कारवाई करून तरतुदीप्रमाणे १५ टक्के व्याजासह रक्कम वसूल करून अदा करावी.

उसाचा को २६५ वाण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेली मान्यताप्राप्त वाण आहे. हा वाण नैसर्गिक चढउतार, पाणीटंचाईसारख्या प्रतिकूल परिस्थितीत तग धरून फारसे नुकसान न होता वजन व साखर उतारा चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या या जातीच्या ऊस नोंदी घेण्याचे काही साखर कारखान्याकडून नाकारले जात आहे. को २६५ जातीच्या उसाच्या नोंदी न घेणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करून नोंदी घेण्याचे बंधनकारक करण्यात यावे.

कार्यक्षेत्रात उसाची कमतरता असल्यास दूरच्या अंतरावरून ऊस गाळपास आणला जातो. मात्र तोडणी वाहतुकीचा खर्चाचा सरासरी भुर्दड कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना सोसावा लागतो. अंतरानुसार ऊस वाहतूक कपात केल्यास कार्यक्षेत्रातील ऊस उपलब्धता आपोआप वाढणार आहे. तरी अंतरानुसार ऊस वाहतूक खर्च धरण्याचा तत्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच शासनाने घातेलेली दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराच्या अटीमुळे साखर कारखान्यांची मक्तेदारी वाढली असून, ठरवून ऊस उत्पादकांची लूट चालू आहे. ही अट शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याने हवाई अंतराची अट तत्काळ रद्द करावी. शेतकऱ्याबरोबर ऊसदर करार न करता गाळप परवाने मिळालेल्या कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...