agriculture news in Marathi, Raghunathdada patil says chief mister handles problems by wrong way, Maharashtra | Agrowon

प्रश्न हाताळण्याची मुख्यमंत्र्यांची पद्धत चुकीची ः रघुनाथदादा पाटील
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

परभणी : कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले नाही. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करू लागल्याने मंत्रालय सुसाइड पाॅइंट झाले आहे. मुख्यमंत्र्यांची प्रश्न हाताळण्याची पद्धत चुकीची आहे. शेतकरी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे सुकाणू समिती आंदोलनाची धार तीव्र करणार आहे, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी (ता. २३) येथे सांगितले.

परभणी : कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले नाही. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करू लागल्याने मंत्रालय सुसाइड पाॅइंट झाले आहे. मुख्यमंत्र्यांची प्रश्न हाताळण्याची पद्धत चुकीची आहे. शेतकरी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे सुकाणू समिती आंदोलनाची धार तीव्र करणार आहे, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी (ता. २३) येथे सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सूकाणू समितीतर्फे २३ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित आंदोलनाची माहिती देण्यासाठी परभणी येथे आयोजित पत्रकार परिषेदत श्री. पाटील बोलत होते. यावेळी सत्यशोधक शेतकरी संघटनेचे किशोर ढमाले, भाकपचे राजन क्षीरसागर, किसान सभेचे विलास बाबर, शेतकरी संघटनेचे बंडू सोळंके, बळिराजा शेतकरी संघटनेचे भानुदास जवंजाळ, माऊली कदम, लिंबाजी कचरे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर ११०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकारला त्याचे गांभीर्य नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत. गरीब शेतकरी मरत असताना मूठभर उद्योजकांना खूश करण्यासाठी कर्जमाफी दिली जात आहे, तरी दररोज एक भांडवलदार सरकारला चुना लावून जात आहे. 

व्यापारी वृत्तीच्या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. शेतकरी चळवळीतील माणसं फोडण्याचे काम सुरू आहे. शेतकरीविरोधी धोरण असलेल्या सरकारच्या विरोधात सुकाणू समिती राज्यभरात आंदोलन तीव्र करणार आहे. १९ मार्च रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालसमोर अन्नत्याग आंदोलन, २३ मार्च रोजी हुतात्मा अभिवादन, तसेच ३० एप्रिल रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.

श्री. ढमाले म्हणाले, जाचक अटी आणि आॅनलाइनच्या घोळामुळे कर्जमाफीसाठी शेतकरी अपात्र ठरत आहेत. कर्जमाफीचे आकडे फसवे असून गावातील शेतकऱ्यांपर्यंत येईपर्यंत यादी बदलत आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्र्यावर विश्वास राहिलेला नाही.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...