agriculture news in marathi, Rahul Bondre arrested and released | Agrowon

अामदार राहुल बोंद्रेंसह कार्यकर्त्यांना अटक, सुटका
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

बुलडाणा : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची वीज तोडल्याने अामदार राहुल बोंद्रे व कार्यकर्त्यांनी चिखली तालुक्यातील केळवद वीज कार्यालयात जाळपोळ केली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून अामदार बोंद्रे व कार्यकर्त्यांना बुधवारी (ता. २७) पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

बुलडाणा : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची वीज तोडल्याने अामदार राहुल बोंद्रे व कार्यकर्त्यांनी चिखली तालुक्यातील केळवद वीज कार्यालयात जाळपोळ केली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून अामदार बोंद्रे व कार्यकर्त्यांना बुधवारी (ता. २७) पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

केळवद परिसरातील गावांमध्ये वीज कंपनीने पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडित केल्यानंतर मंगळवारी (ता. २६) रात्री जाळपोळ झाली होती. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल चितोडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार चिखली पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह ९ जणांविरुद्ध शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि जाळपोळ करणे या कारणाखाली गुन्हे दाखल केले हाेते. या प्रकरणी चिखली पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळल्यानंतर आमदार बोंद्रे यांनीही स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन अटक करून घेतली होती. पोलिसांनी राहुल बोंद्रे यांच्यासह म. रिझवान सौदागर, रमेश रंगनाथ सुरडकर, संजय गिरी, किशोर साळवे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, शेख अनसार, भगवानसिंग राजपूत, विशाल साळोक यांना अटक केली. पोलिसांनी या सर्वांना स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

मलकापूर नगराध्यक्षांनाही जामीन
मलकापूर तालुक्‍यातील जांबुळधाबा येथील वीज उपकेंद्राची तोडफोड आणि साहित्याची जाळपोळ केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ व नऊ जणांना मंगळवारी (ता. २६) रात्री पोलिसांनी अटक केली. त्यांना बुलडाणा न्यायालयात बुधवारी हजर केले असता, न्यायालयाने गुरुवार (ता. २८)पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली होती. गुरुवारी या अांदोलकांना न्यायालयाने जामीन दिला.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...