गुजरातमध्ये शिक्षणावर खर्च कमी का : राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

नवी दिल्ली ः विधानसभा निवडणुकीच्या पाश्‍वभूमीवर गुजरातमधील अनेक मुद्यांवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारला प्रश्न विचारले अाहेत. गुजरातमध्ये राज्य सरकार शिक्षणावर खर्च कमी करत असल्याबद्दल त्यांनी चौथा प्रश्न ट्विटरद्वारे उपस्थित केला अाहे.

‘‘सरकारी शिक्षणावर खर्च करण्यात गुजरात २६ व्या क्रमाकांवर का अाहे. राज्यातील तरुणांनी काय चूक केली अाहे की ज्यामुळे राज्य सरकार शिक्षणावर खूप कमी खर्च करत अाहे,’’ असा प्रश्न त्यांनी केला अाहे. सरकारी शाळांमधील शिक्षणाचे व्यावसायिकरण केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत अाहे. यामुळे नवीन भारताचे स्वप्न कसे साकारणार, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर केली अाहे.

याअाधी राहुल गांधी यांनी, सार्वजनिक पैशाचा वापर खासगी कंपन्यांकडून वाढीव दराने वीज खरेदीसाठी केला जात असल्याबद्दल मोदी सरकारकडे प्रश्न उपस्थित केला होता. अाता त्यांनी शिक्षणावरील खर्चाच्या मुद्यावर भाजप सरकारला प्रश्न केला अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com