भात वाण संशोधक दादाजी खोब्रागडे कुटुबियांचे राहूल गांधी यांच्याकडून सांत्वन
भात वाण संशोधक दादाजी खोब्रागडे कुटुबियांचे राहूल गांधी यांच्याकडून सांत्वन

दादाजी खोब्रागडे कुटुबियांचे राहूल गांधी यांच्याकडून सांत्वन

चंद्रपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (बुधवाऱ) त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी गेले. तेथे त्यांनी कृषि संशोधक आणि एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. त्यानंतर तेथून ते शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पायी चालत गेले.  याप्रसंगी बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, ''देशातील एखादा उद्योगपती कोट्यवधी रुपये घेऊन देशाबाहेर पळून जाऊ शकतो, तर सरकारने देशातील शेतकऱ्यांचेही कर्जही माफ केले पाहिजे आणि हे सरकार सहज करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा विश्वास तोडला."

शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, ''जनतेचा पैसा बळकावून श्रीमंतांच्या खिशात भरला जात आहे. मोदी मूळ प्रश्न सोडून भलतेच मुद्दे समोर करतात. नेत्याचे काम देशाला विश्वास देण्याचे आहे, मात्र मोदी विश्वासघात करीत आहेत. रोजगार, शेतकरी प्रश्न, आरोग्य, शिक्षण महत्वाचे आहे, मात्र मोदींचे याकडे अजिबात लक्ष नाही. कर्जमाफीशी मोदींना काहीही देणेघेणे नाही. काही उद्योगपती त्यांची योग्य मार्केटिंग करीत असल्याने शेतकाऱ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. मोदी आपल्या मित्र उद्योगपतींसाठीच काम करीत आहेत. आम्ही सत्तेत येताच कर्नाटक आणि पंजाबमध्ये कर्जमाफी केली. एक वर्षाचे मनरेगाचे पैसे नीरव मोदी, विजय मल्ल्या घेऊन पळाले. एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. बड्या श्रीमंत उद्योगपतीना कर्ज माफ केले, शेतकऱ्यांना नाही.'' मंगळवारी (ता.१३) त्यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच ते भिवंडी न्यायालयातही उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com