नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४५ मंडळांमध्ये पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४५ मंडळांमध्ये पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४५ मंडळांमध्ये पाऊस

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांतील १४५ मंडळांतील गावशिवारात हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निवघा (९३ मिमी), तळणी (९७ मिमी) अतिवृष्टी झाली. सोमवारी (ता. ९) दुपारपर्यंत अनेक मंडळांमध्ये भुरभुर पाऊस सुरू होता.

सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंत तीन जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस झाला आहे. काही तालुक्यांत जोरदार तर अनेक तालुक्यांत भिज पाऊस झाला. भिज पाऊस नुकत्याच उगवू लागलेल्या पिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. तर मुसळधार पावसामुळे बांध फुटून जमीन खरडून गेल्या आहेत. त्यामुळे मुळ्या उघड्या पडून पिकांचे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील ७७ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हदगाव, हिमायनगर, किनवट, भोकर तालुक्यांत पावसाचा जोर कायम होता. देगलूर, नायगाव, कंधार, मुखेडमध्ये जोर कमी झाला. नांदेड, अर्धापूर, बिलोली, लोहा तालुक्यांत जोर वाढला. परभणी जिल्ह्यातील ३८ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. पूर्णा, जिंतूर, सेलू, मानवत तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. पाथरी तालुक्यातील मंडळातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पावसाचा जोर कायम होता. वसमत, सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ तालुक्यात जोर वाढला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ः नांदेड शहर १४, नांदेड ग्रामीण १३, वजीराबाद ११, वसरणी १६, तरोडा १५, तुप्पा १५, लिंबगाव ५५, विष्णुपुरी १७, अर्धापूर १९, दाभड १४, मालेगाव २२, हदगाव २८, तामसा २९, मनाठा ७, पिंपरखेड ४३, निवघा ९३, तळणी ९७, आष्टी १७, किनवट ४४, इस्लापूर २५, मांडवी २२, बोधडी १७, दहेली १७, जलधारा ७, शिवणी १३, माहूर १७, वाई २६, वानोळा ७, हिमायतनगर ५८, सरसम ४७, जवळगाव ३५, मुदखेड ७, मुगट ७, बारड ८,भोकर १७, मोघाळी ४५, मातुळ १०, किणी ८, उमरी ८, शिंदी १०, गोलेगाव ९, धर्माबाद ५, जारिकोट १०, करखेली ८, नायगाव ११, बरबडा १७, कुंटूर १०, बिलोली १०, लोहगाव १५, कुंडलवाडी १२, सगरोळी १३, आदमापूर ९, शहापूर ५, हानेगाव ५, जहूर ५, मुक्रमाबाद ९, बाऱ्हाळी ५, कंधार ५, पेठवडज ९, उस्माननगर ९, बारुळ ५, लोहा ९, मालकोळी ११, कलंबर २५, शेवडी २१, सोनखेड ३२, कापशी ५. परभणी जिल्हा ः परभणी शहर ५, परभणी ग्रामीण ५, सिंगणापूर ६, जांब २५, झरी ३६, जिंतूर १७, बोरी २८, सावंगी म्हाळसा १८, चारठाणा १०, बामणी ३०, सेलू ८, देऊळगाव ५, कुपटा १८, वालूर १७, चिकलठाणा १७, मानवत १९, केकरजवळा १६, कोल्हा १६, पाथरी १२, सोनपेठ ५, पालम ९, पूर्णा ६४, ताडकळस १५, कात्नेश्वर १८, चुडावा १९. हिंगोली जिल्हा ः हिंगोली १०, खंबाळा ५, माळहिवरा ७, सिरसम ९, बासंबा ३२, नरसी नामदेव ७, डिग्रस १६, कळमनुरी ४२, नांदापूर २१, आखाडा बाळापूर ३६, डोंगरकडा २५, वारंगा फाटा २२, वाकोडी ४५, सेनगाव २५, गोरेगाव ३२, आजेगाव ३१, पाकनेरगाव ९, हत्ता १५, वसमत ३४, हट्टा २२, गिरगाव १९, कुरुंदा ५०, टेंभुर्णी १८, आंबा २४, हयातनगर ३२, औंढानागनाथ ७, जवळा बाजार २८, येळेगाव १३, साळणा १९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com