नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४८ मंडळांमध्ये पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४८ मंडळांमध्ये पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४८ मंडळांमध्ये पाऊस

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये मंगळवारी (ता.१७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १४८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील वसरणी (८३ मिमी), तुप्पा (७० मिमी), लिंबगांव (८० मिमी), परभणी जिल्ह्यातील पाथरी (७९ मिमी), मानवत (६८ मिमी), पूर्णा (९८ मिमी) मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे इसापूर आणि विष्णुपुरी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली असून अनुक्रमे २५.०६ टक्के आणि ७१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. या तीन जिल्ह्यांतील अनेक भागात सोमवारी (ता.१६) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० मंडळांमध्ये पाऊस झाला. नांदेड तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. अर्धापूर, भोकर, उमरी, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली, लोहा, नायगाव, मुखेड, तालुक्यात पावसाचा जोर वाढला. माहूर, किनवट तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला. परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३८ मंडळांमध्ये पाऊस झाला. जिंतूर वगळता अन्य तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगांव तालुक्यात जोर अधिक होता.

परभणी जिल्हा ः परभणी शहर ३२, परभणी ग्रामीण ३०, पेडगाव २९, जांब ४५, झरी ६०, सिंगणापूर ४०, दैठणा २७, पिंगळी ३४, बोरी २४,चारठाणा ६, सावंगी म्हाळसा ८, चारठाणा १२, सेलू २४, देऊळगांव ४०, कुपटा २८, वालूर ३७, चिकलठाणा २४, मानवत ६८, केकरजवळा ४८, कोल्हा ३४, पाथरी ७९, बाभळगांव ३६, हदगांव ३०, सोनपेठ २४, आवलगांव २०, गंगाखेड १४, महातपुरी १८, माखणी १३, राणीसावरगांव ८, पालम ११, चाटोरी ९, बनवस ५, पूर्णा ९८, ताडकळस ४२, लिमला ३२, कात्नेश्वर ४८, चुडावा ५६. हिंगोली जिल्हा ः हिंगोली १५, खंबाळा १२, माळहिवरा ४५, सिरसम ४२, बासंबा २४, डिग्रस ११, कळमनुरी २३, नांदापूर २५, आखाडा बाळापूर १९, डोंगरकडा १६, वारंगा फाटा २२, वाकोडी २०, सेनगांव १६, गोरेगांव १६, आजेगांव २५, साखरा ६, पानकनेरगांव १६, हत्ता १५, वसमत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com