agriculture news in marathi, Rain accompanied by thundershowers of Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने गुरुवारी (ता. २१) हजेरी लावली. यामध्ये नाझरा (ता. सांगोला) व हुलगेवाडी (ता. करमाळा) येथील प्रत्येकी एक, अशा दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाला.

सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने गुरुवारी (ता. २१) हजेरी लावली. यामध्ये नाझरा (ता. सांगोला) व हुलगेवाडी (ता. करमाळा) येथील प्रत्येकी एक, अशा दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाला.
नाझरा (ता. सांगोला) येथे अंगावर वीज पडल्याने युवक विलास भारत भंडारे (वय २८) यांचा मृत्यू झाला. विलास भंडारे हे धार्मिक कार्यक्रमानिमित्त नातेवाइकांसोबत नाझरे गावालगत असलेल्या माण नदीच्या कोरड्या पात्रात गेले होते. बुधवारी (ता. २०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसाला सुरवात झाली होती. त्या वेळी वीज पडल्याने विलास भंडारे जखमी झाले तर सोबत असलेले बोकडाचा मृत्यू झाला. त्यांना सांगोल्यातील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणले असता डॉक्‍टर चौगुले यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. भालचंद्र भारत भंडारे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हुलगेवाडी (ता. करमाळा) येथे गंगाराम तुकाराम वाघमारे (वय ४८) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गंगाराम हे आज (गुरुवारी) शेतात शेळी चारण्यासाठी गेले होते. दुपारी ३.३०च्या सुमारास पडलेल्या पावसात गंगाराम वाघमारे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. कोर्टीचे तलाठी एस. जे. गोडसे, पोलिस पाटील खंडेराव बाबूराव शेरे यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास कोर्टी, पोंधवडी, विहाळ, उमरड परिसरात जोरदार पाऊस झाला. महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. आज झालेल्या चांगल्या पावसाने या भागातील शेतकरी समाधानी आहेत. े    

अक्कलकोटमध्ये जोरदार पाऊस
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्‍यात आज सायंकाळी दिवसभराच्या असह्य उकड्यानंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाचे पुनरागमन झाले आहे. अक्कलकोट शहर, दहिटणे आदी भागांत तासभर जोरदार पाऊस होऊन ठिकठिकाणी पाणी साठले आहे. दरम्यान, आज सायंकाळी घोळसगाव येथे वीज कोसळून विजयकुमार तात्याराव पाटील यांची एक म्हैस मृत्युमुखी पडली आहे.

केत्तूर परिसरात पावसाचे कमबॅक
केत्तूर : सुमारे तीन आठवड्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर केत्तूर (ता. करमाळा) परिसरात मॉन्सूनचे आगमन झाले असून केत्तूरसह पारेवाडी, दिवेगव्हाण, हिंगणी, गुलमोहरवाडी, वाशिंबे, गोयेगाव, सावडी, कुंभारगाव, देलवडी, पोमलवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले.

जिंती परिसरात पाऊस
जिंती : जिंती परिसरात आज सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिंती, कात्रज, भिलारवाडी, भगतवाडी, कुंभारगाव, देलवडी आदी परिसरात सुमारे एक तास पाऊस झाला. परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...