agriculture news in marathi, rain in akola, buldhana district, maharashtra | Agrowon

अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊस
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

अकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. २१) सायंकाळपासून रिमझिम पावसाला सुरवात झाली. अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अकोला, बुलडाण्यात पावसाचा जोर अधिक होता. मात्र वाशीममध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला.  

अकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. २१) सायंकाळपासून रिमझिम पावसाला सुरवात झाली. अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अकोला, बुलडाण्यात पावसाचा जोर अधिक होता. मात्र वाशीममध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला.  

अकोल्यात शनिवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी ४४.३, बुलडाणा जिल्ह्यात ३१.६, तर वाशीममध्ये अवघ्या १.३ मिमी पावसाची नोंद झाली. या भागात २२ ऑगस्टनंतर प्रथमच पाऊस झाला आहे. जवळपास महिनाभराच्या अंतराने हा सर्वदूर पाऊस नोंदविला गेला. जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर या चार तालुक्‍यांत ५० तर बार्शीटाकळी, पातूर या तालुक्‍यांत २५ मिमीपर्यंत पाऊस झाला.

बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली मलकापूर तालुक्‍यात सर्वाधिक ६०.४ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय संग्रामपूर येथे ५८.२, जळगाव जामोद येथे ५७.८, नांदुरा येथे ५१.४ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय बुलडाणा येथे ३३.१, चिखली येथे २१.५, देऊळगाव राजा येथे ५.४, सिंदखेडराजा येथे ११.७, लोणार येथे १४.५, मेहकर येथे २०.१, खामगाव येथे १५.१, शेगाव येथे २४.८, मोताळा येथे ३७.१ मिमी पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात पिकांची दयनीय स्थिती झाली होती. या पावसामुळे कपाशी, तूर, ज्वारी या पिकांना फायदा होणार आहे. शिवाय पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या रब्बीसाठीसुद्धा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पावसाने सर्वच पिकांना जीवदान दिले आहे.

वाशीम जिल्ह्यात मात्र फारसा पाऊस झालेला नाही. मंगरूळपीर, मानोरा या दोनच तालुक्‍यांत हलक्‍या स्वरूपात पाऊस झाला. उर्वरित ठिकाणी पावसाची नोंदसुद्धा होऊ शकलेली नाही. वाशीममध्येही सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना पावसाची मोठी गरज आहे.
२५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून पाऊस नसल्याने सोयाबीनला याची सर्वाधिक झळ सहन करावी लागली. सोयाबीनचे उत्पादन किमान ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत घटू शकते असे शेतकरी सांगत आहे. शेंगामध्ये दाणे भरण्याच्या स्थितीत पावसाची नितांत गरज होती. याचवेळी पाऊस झाला नाही. आता पाऊस येऊनही सोयाबीनला त्याचा तितकासा फायदा होण्याची शक्‍यता नाही.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...