agriculture news in marathi, rain in akola, washim district, maharashtra | Agrowon

अकोला, वाशीम जिल्ह्यांत पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

अकोला : अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस झाला अाहे. या पावसामुळे पेरण्याच्या कामांना गती मिळणार अाहे.

मंगळवारी (ता.२६) दुपारनंतर अकोला जिल्ह्यात अकोट व तेल्हारा हे दोन तालुके वगळता उर्वरित ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली असून, मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ५२.२ मिमी पाऊस झाला. अकोला तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. या तालुक्यात २८.९ मिमी पाऊस झाला.

अकोला : अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस झाला अाहे. या पावसामुळे पेरण्याच्या कामांना गती मिळणार अाहे.

मंगळवारी (ता.२६) दुपारनंतर अकोला जिल्ह्यात अकोट व तेल्हारा हे दोन तालुके वगळता उर्वरित ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली असून, मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ५२.२ मिमी पाऊस झाला. अकोला तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. या तालुक्यात २८.९ मिमी पाऊस झाला.

जिल्ह्यात अद्याप सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट, तेल्हारा या दोन्ही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला नाही. बुधवारी सकाळपर्यंत या दोन्ही तालुक्यांत अनुक्रमे ३.३ व ०.५ मिमी पावसाची नोंद झाली. तेल्हारा तालुक्यात जून महिन्यात अातापर्यंत अवघा ५.६ तर अकोटमध्ये १४.५ मिमी पाऊस नोंदला गेला अाहे. बार्शिटाकळी, पातूर, बाळापूर या तालुक्यांमध्ये अनुक्रमे १२, ११.४ अाणि १७.७ मिमी पावसाची नोंद झाली.

अाजवर जिल्ह्यात अकोट व तेल्हारा हे दोन तालुके पावसाच्या बाबतीत बरेच पिछाडीवर राहले अाहेत. जो काही पाऊस झाला तो सलग व सार्वत्रिक नव्हता. ज्या पेरण्या झाल्या त्या कमी पावसामुळे अधांतरीच आहेत. काही ठिकाणी लागवड झालेले क्षेत्र उलटण्याची भीती व्यक्त होत अाहे.            

जिल्ह्यात अातापर्यंत सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस झालेला नसल्याने पेरण्यांची कामे रखडलेली अाहेत. कृषी विभागाने या हंगामासाठी चार लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले अाहे. अातापर्यंत पाच टक्के म्हणजे २५ हजार २१८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र दोन लाख १५ हजार हेक्टर असून, त्या तुलनेत सुमारे १६ हजार हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची तर अवघी दोन टक्के लागवड झाली अाहे. जिल्ह्यात या वेळी कपाशीचे नियोजित लागवड क्षेत्र १ लाख २१ हजार हेक्टर अपेक्षित असून, केवळ ३४१० हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...