agriculture news in marathi, Rain in attendance in 178 congregations in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील १७८ मंडळांत पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 जुलै 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील १७८ मंडळात सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाची ही हजेरी राहिली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्‍यांतर्गत निधवा व तळणी मंडळात अनुक्रमे ९३ व ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील १७८ मंडळात सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाची ही हजेरी राहिली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्‍यांतर्गत निधवा व तळणी मंडळात अनुक्रमे ९३ व ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ३९ मंडळांत पावसाची २ ते ५२ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. सिल्लोड तालुक्‍यातील अजिंठा मंडळात ५२ मिलिमीटर, तर औरंगाबाद तालुक्‍यातील चौका, लाडसावंगी, भावसिंगपुरा, चित्तेपिंपळगाव या मंडळांमध्ये २० ते ४५ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, मंठा तालुक्‍यांतील बहुतांश भागात मध्यम ते दमदार पाऊस पडला. २ ते ६४  मिलिमीटरदरम्यान नोंदल्या गेलेल्या या पावसाचा जोर बदनापूर तालुक्‍यातील दाभडी मंडळात सर्वाधिक होता. बीड जिल्ह्यातील ४१, लातूर जिल्ह्यातील २९ मंडळांत पावसाची तुरळक ते हलकी हजेरी लागली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ मंडळात हजेरी लागलेल्या पावसाचा जोर परंडा तालुक्‍यात सर्वाधिक झाला. परंडा तालुक्‍यातील परंडा मंडळात ४०, जेवळा बु. मंडळात ४२, अनाळा मंडळात ३५, सोनारी मंडळात १६, अशु मंडळात २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यात दौलावडगाव, पिंपळा, टकाळशिंगी, मंडळात प्रत्येकी २२ मिलिमीटर, आष्टी मंडळात २५ मिलिमीटर, तर धानोरा मंडळात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अंबाजोगाई व परळी तालुक्‍याकडे पावसाचा थेंबही पडला नाही. नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर थोड अधिक आहे.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, लोहा, किनवट, तालुक्‍यात सरासरी १८ ते २० मिलिमीटर, तर हदगाव तालुक्‍यात सरासरी ४४.८६ व हिमायतनगर तालुक्‍यात ४६.६७ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत औंढा नागनाथ या पाचही तालुक्‍यांमध्ये सरासरी १२.२९ मिलिमीटर ते ३१.८३ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

४२ मंडळात पावसाचा टक्‍का पन्नासच्या आत
हिंगोली व लातूरवगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील ४२ मंडळात अजून आजवर अपेक्षीत पावसाच्या तुलनेत ५० टक्‍क्‍यांच्या आतच पाऊस झाला आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील तीन तसेच जालना व बीडमधील प्रत्येकी एका मंडळात अपेक्षीत पावसाच्या तुलनेत २५ टक्‍क्‍यांच्या आतच पाऊस पडला, तर ३७ मंडळांत अपेक्षेच्या तुलनेत २५ ते ५० टक्‍के पाऊस पडला. ७६ मंडळांत ५० ते ७५ टक्‍के, ९४ मंडळांत ७५ ते १०० टक्‍के, तर २०९ मंडळांत शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...