agriculture news in Marathi, rain became weak in kerla, Maharashtra | Agrowon

केरळात पावसाचा जोर कमी; मदतकार्यात वेग
वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

तिरुअनंतपुरम/कोची  : दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने केरळमध्ये बचाव पथकांच्या कामाला वेग आला आहे. लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, मच्छीमार आणि स्थानिक नागरिक मदतीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. ८ ऑगस्टनंतर आलेल्या पावसाने आतापर्यंत २१६ बळी गेले आहेत. 

तिरुअनंतपुरम/कोची  : दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने केरळमध्ये बचाव पथकांच्या कामाला वेग आला आहे. लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, मच्छीमार आणि स्थानिक नागरिक मदतीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. ८ ऑगस्टनंतर आलेल्या पावसाने आतापर्यंत २१६ बळी गेले आहेत. 

दक्षिण कमांडचे लेप्टनंट जनरल डी. आर. सोनी म्हणाले, की बोट, लाइफ जॅकेट आणि फूड पॅकेटसमवेत सुमारे ७० पथक पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी वीज आणि हेलिकॉप्टर पोचू शकत नाही, अशा ठिकाणी जवान पोचत आहेत. अतिशय कठीण परिस्थितीत जवानांनी शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम केले आहे.

बचावकार्य करणाऱ्या सर्व पथकात उत्तमरित्या समन्वय असल्याने हे काम शक्‍य झाल्याचे सोनी म्हणाले. प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी आम्ही काम करतच राहू, असे सोनी म्हणाले. बचाव कार्य बंद केलेले नसून प्रशासन जोपर्यंत या संकटपासून सावरत नाही, तोपर्यंत आम्ही काम करतच राहणार, असे सोनी म्हणाले. गेल्या दोन दिवसांत केरळमध्ये पावसाची तीव्रता कमी झाली आहे. तसेच हवामान खात्यानेदेखील मुसळधार पावसाचा इशारा दिलेला नाही. 

केरळमधील आठ ऑगस्टनंतरची स्थिती...
 मृतांची संख्या : २१६ 
 निर्वासित : ७.२४ लाख 
 शिबिर : ५६४५ 
 मदतकार्यातील जवान : १५००

कर्नाटकातील पूरस्थिती गंभीर
गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या पावसामुळे कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील पूरस्थिती सोमवारी (ता. २०) पाचव्या दिवशीही गंभीर होती. लष्कर, नौदल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासह नागरी बचाव दलाचे बचाव व मदत कार्य वेगाने सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत नऊ जणांचे बळी गेले असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. 

या डोंगराळ जिल्ह्यात पाऊस अद्याप सुरूच आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने नागरिक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी आणि पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी बचाव पथकाने जादा वेळ काम केले. दरड कोसळण्याच्या असंख्य घटनांमुळे १२३ किलोमीटरचे रस्ते त्याखाली गाडले गेले किंवा वाहून गेले असल्याचे महसूल विभागाने सांगितले.

जिल्ह्यातील तीन हजार ८०० ट्रान्सफॉर्मर व खांब कोसळल्याने अनेक भागांत आज पाचव्या दिवशीची वीजपुरवठा खंडित झालेला होता. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी व अन्य भागातही पूरस्थिती गंभीर आहे. कृष्णा नदी व तिच्या उपनद्यांमधून विसर्ग सोडण्यात आला आहे. नदीकाठच्या लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. या भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पूर्वबांधणी केलेल्या घरे उभारणार 
कोडगू जिल्ह्यात भूस्खलनामुळे शेकडो लोक बेघर झाले आहेत. अशा लोकांसाठी पूर्वबांधणी केलेल्या घरांची उभारणी करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी सोमवारी दिली. बंगळूर महापालिकेतर्फे ३.१८ कोटी रुपयांची मदत करण्यात आली असून यातील एक कोटी रुपये केरळच्या पूरग्रस्तांसाठी पाठविले आहेत. 

कोडगू जिल्ह्यातील पूरस्थिती 
 नागरिकांची सुटका: ४२००
 ट्रान्सफॉर्मर व विजेचे खांब पडले: ३८००
 बचाव पथकांतील जवान: १२०० 

इतर अॅग्रो विशेष
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...