परतीचा पाऊस ठरला तूर पिकाला उपयुक्त

फुलोरावस्थेत पाण्याची गरज होती. पाऊस आणि पाणी नसल्याने तूर पीक धोक्‍यात आले होते. मात्र परतीचा पाऊस तूर पिकास उपयुक्त ठरला आहे. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. - सुनील तेली, तूर उत्पादक शेतकरी, डफळापूर, ता. जत
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
सांगली ः परतीचा पाऊस झाल्याने तूर पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या तूर पीक फुलोरावस्थेत असून तूर पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
 
जिल्ह्यात सुमारे ७५०७ हेक्‍टरवर खरीप हंगामात तुरीचा पेरा झाला आहे. अपेक्षित पाऊस नसल्याने यंदा तुरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. पहिल्या पावसावर तुरीची पेरणी झाली. पेरणी झाल्यानंतर पावसाने दांडी मारली होती.
 
दुष्काळी भागातील अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर पिकावर कुळव फिरवला होता. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवेठमहांकाळ, खानापूर आणि जत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात तुरीचे क्षेत्र आहे. 
 
सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरमध्ये जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी याभागातही दमदार पाऊस झाला आहे. हा पाऊस तूर पिकासाठी उपयुक्त ठरू लागला आहे. पावसामुळे तूर पिकाची चांगली वाढ झाली आहे. फुलोरावस्थेत पाऊस झाल्याने तुरीला फुलकळीही बहरली आहे. यामुळे उत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे.
 
तालुकानिहाय तूर पीक क्षेत्र (हेक्‍टर)
 
तालुका क्षेत्र
मिरज ४२०
जत ३९३६
खानापूर १२५०
वाळवा ३३०
तासगाव ७८८
शिराळा ४२
आटपाडी १३९
कवठेमहांकाळ २९३
पलूस ४२
कडेगाव २०४

 

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com