agriculture news in Marathi, rain on bogus fertilizer factory, Maharashtra | Agrowon

बनावट खतनिर्मिती कारखान्यावर गुणवत्ता नियंत्रण विभागाचा छापा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 मे 2019

नाशिक : केवळ सेंद्रिय खतांच्या उत्पादनाचा परवाना असताना जिल्ह्यातील भेंडाळी (ता. निफाड) येथील बेकायदा विविध प्रकारची बोगस खते तयार करून विक्री करणाऱ्या खतनिर्मिती कारखान्यावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. यात ५० किलो वजन असलेल्या बनावट खतांच्या १६२७ गोण्या जप्त केल्या असून, यात १५ लाख २१ हजार ९०० रुपये किमतीच्या १ हजार ६२७ बोगस खतांच्या गोण्या जप्त करण्यात यश आले आहे.

नाशिक : केवळ सेंद्रिय खतांच्या उत्पादनाचा परवाना असताना जिल्ह्यातील भेंडाळी (ता. निफाड) येथील बेकायदा विविध प्रकारची बोगस खते तयार करून विक्री करणाऱ्या खतनिर्मिती कारखान्यावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. यात ५० किलो वजन असलेल्या बनावट खतांच्या १६२७ गोण्या जप्त केल्या असून, यात १५ लाख २१ हजार ९०० रुपये किमतीच्या १ हजार ६२७ बोगस खतांच्या गोण्या जप्त करण्यात यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीज ही कंपनी खतांची निर्मिती करते. या कंपनीला सेंद्रिय खतांच्या निर्मितीचे परवाने आहेत. मात्र ही कंपनी अनधिकृतपणे दोन प्रकारची पोटॅशयुक्त खते व कॅल्शियम- सिलिकॉन अशी खतांची निर्मिती करते. या ठिकाणी सम्राट ॲग्रो इंडस्ट्रीज (भेंडाळी, निफाड) व एन. के. फर्टिलायझर (राहुरी) या कंपन्यांचे उत्पादन होत होते. याबाबत गुणनियंत्रण विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी या कंपनीवर छापा टाकला. केलेल्या या कारवाईत भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना या कारखान्याच्या गोडावूनमधून १५ लाख २१ हजार ९०० रुपये किमतीच्या १ हजार ६२७ बोगस खतांच्या गोण्या जप्त करण्यात यश आले आहे. 

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी किरण विरकर यांनी सायखेडा पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. कंपनीच्या मालकांविरुद्ध आणि एन. के. फर्टिलायझर अॅण्ड केमिकल, राहुरी यांच्याविरोधात खतनियंत्रण आदेश, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि भा.दं.वि. कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कंपनी एकच, मात्र उत्पादन दोन कंपन्यांचे? 
भरारी पथकाने या ठिकाणी छापा टाकला असताना सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीज व एन. के. फर्टिलयझर या दोन कंपन्यांच्या खतांच्या गोण्या आढळून आल्या. या ठिकाणी गोडावूनमध्ये साठविलेल्या आणि तयार होत असलेल्या सुपर फॉस्फेट, पोटॅश यांसारख्या रासायनिक खतांच्या निर्मितीचा आणि विक्रीचा राज्य किंवा केंद्र सरकारचा कोणताही परवाना आढळून आला नाही. या कंपनीत सुपर फॉस्फेटच्या ६१०, प्रसाद मॅक्स पोटॅशच्या १५३, बलवान सिलिकॉनच्या ७५६ आणि सम्राट नॅचरल पोटॅशच्या १०८ अशा एकूण १ हजार ६२७ खतांच्या बॅगा आढळून आल्या. याच खतनिर्मिती कारखान्यात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील एन. के. फर्टिलायझर अॅण्ड केमिकल या कंपनीच्या नावाच्या पोटॅश खतांच्या बॅगांचे उत्पादन आणि पॅकिंग सुरू असल्याचे छाप्यात समोर आले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...