agriculture news in Marathi, rain break till Friday, Maharashtra | Agrowon

पावसाची शुक्रवारपर्यंत उघडीप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे : राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  

पुणे : राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  

पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढला आहे. कोकण, मराठवाडा अाणि विदर्भात सर्व ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गेला आहे. तर, मध्य महाराष्ट्रात तापमान २७ ते ३० अंशांच्या असपास आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  

सोमवारी उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, हे क्षेत्र पुढील दोन दिवस याच भागात स.िक्रय राहणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या दक्षिण भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. 

ईशान्य भारतातही पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तर, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाची उघडीप कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

सोमवारी (ता.३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.४, कोल्हापूर २७.७, महाबळेश्वर २०.०, मालेगाव ३१.२, नाशिक २८.०, सांगली २८.४, सातारा २७.१, सोलापूर ३३.४, मुंबई ३०.२, अलिबाग ३०.१, रत्नागिरी २९.४, डहाणू ३१.०, आैरंगाबाद ३०.९, परभणी ३२.४, नांदेड ३२.५, अकोला ३२.५, अमरावती ३०.८, बुलडाणा ३०.७, चंद्रपूर ३२.४, गोंदिया ३०.८, नागपूर ३१.७, वर्धा ३१.०, यवतमाळ ३०.०. 

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून आढावानाशिक : हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...