agriculture news in marathi, Rain breaks in sowing | Agrowon

पेरणीच्या गतीला पावसाच्या खंडाने ब्रेक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

औरंगाबाद : आधी बोंड अळीचा धसका व आता पावसाच्या खंडाने मराठवाड्यातील बहुतांश भागातील कपाशी लागवड व पेरणीच्या कामाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. दमदार ते काही भागांत जोरदार सुरवात करणाऱ्या यंदाच्या पावसाने मराठवाड्यातील खरिपाच्या पेरणीला सुरवात करण्याची संधी निर्माण केली होती. परंतु दोन ते तीन  दिवसांपासून मराठवाड्यात सर्वदूर दिलेल्या उघडिपीने पेरणीच्या गतीला ब्रेक लावण्याचे काम केले आहे. पेरणीचे आकडे अपडेट होणे बाकी असले, तरी मराठवाड्याच्या कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार बीड जिल्ह्यातील माजलगाव व जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यातच काय ती पेरणीची नोंद झाली.

औरंगाबाद : आधी बोंड अळीचा धसका व आता पावसाच्या खंडाने मराठवाड्यातील बहुतांश भागातील कपाशी लागवड व पेरणीच्या कामाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. दमदार ते काही भागांत जोरदार सुरवात करणाऱ्या यंदाच्या पावसाने मराठवाड्यातील खरिपाच्या पेरणीला सुरवात करण्याची संधी निर्माण केली होती. परंतु दोन ते तीन  दिवसांपासून मराठवाड्यात सर्वदूर दिलेल्या उघडिपीने पेरणीच्या गतीला ब्रेक लावण्याचे काम केले आहे. पेरणीचे आकडे अपडेट होणे बाकी असले, तरी मराठवाड्याच्या कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार बीड जिल्ह्यातील माजलगाव व जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यातच काय ती पेरणीची नोंद झाली.

त्यानुसार माजलगाव तालुक्‍यात ४३५ हेक्‍टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. तर, भोकरदन तालुक्‍यात ५४५ हेक्‍टरवर कपाशी, जवळपास २५०० हेक्‍टरवर मीरची, तर जवळपास शंभर हेक्‍टर क्षेत्रावर ज्वारी-बाजरीची पेरणी आटोपल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. भोकरदन तालुक्‍यातील केदारखेडा, राजूर व हसनाबाद या तीन मंडळांतच विशेषकरून पावसाचे प्रमाण बरे राहिल्याने पेरणीने गती पकडली होती.

सिंचनाची सोय असलेल्यांच्या पिकांना पावसाच्या या खंडात पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न होईलही; परंतु ज्यांच्याकडे कुठलीही सिंचनाची सोय नाही, अशा कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. खामखेडा शिवारात कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची पडलेल्या पाण्याच्या भरश्‍ाावर लागवड केलेली जवळपास साठ टक्‍के कपाशी उगवली, तर जवळपास चाळीस टक्‍के बादही झाल्याची माहिती शेतकरी सोमनाथ नागवे यांनी दिली. पावसाच्या आजवरच्या प्रमाणानुसार मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी २७० मंडळांत आजवर अपेक्षित पावसाच्या तुलनेत शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला. तर, उर्वरित मंडळात अपेक्षित पावसाच्या तुलनेत पाऊसच पडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनियमित व खंड देणाऱ्या पावसाचा थेट परिणाम खरिपाच्या पेरणीवर झाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...