agriculture news in Marathi, rain came but is rain will avoid loss, Maharashtra | Agrowon

पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?
संतोष मुंढे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना

जालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(ता. १६)नंतर पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली खरी, पण आता महिनाभराच्या खंडाचा कोणत्या पिकांना नेमका किती फटका बसला? पावसामुळे फायदा झाला तर तो किती होईल? नुकसान भरून निघेल का? अशा शंका शेतकरी उपस्थित करत आहेत.

झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना

जालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(ता. १६)नंतर पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली खरी, पण आता महिनाभराच्या खंडाचा कोणत्या पिकांना नेमका किती फटका बसला? पावसामुळे फायदा झाला तर तो किती होईल? नुकसान भरून निघेल का? अशा शंका शेतकरी उपस्थित करत आहेत.

सुलतानी संकटाचा सामना करता येईल, पण अस्मानी संकटाचं काय करावं. एक दोन वेळा पेरणी केली, पण पावसानं खरीप पिकांवर संकट तोंडावर आणून ठेवलं होतं. सकाळीच मंडप टाकून बसणारे ढग सायंकाळी बेपत्ता होत होते. कुठं आलेच तर चार दोन थेंब पडून लागलीच निघून जात. जी लोक शेतात काम करताना दिसतात त्यांचं मन कामात लागत नव्हतं. बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद व जालना तालुक्‍यात केलेल्या पाहणीत शेतकऱ्यांनी पावसाच्या खंडाने निर्माण झालेल्या स्थितीची माहिती दिली. 

भोकरदन तालुक्‍यातील मूळच्या केदारखेडा येथील रहिवासी मात्र जवखेड ठोंबरे येथील लक्ष्मी सुरेश मोरे व सुरेश मोरे यांना पाऊस येईल का? असं विचारताच, देवालाचं डोळे म्हणून गप्प झाल्या. निंदण करतोय, पण कामात जीव लागत नाही. पिकाकडं पाहावंसं वाटत नाही. चार वर्ष झाली तळ्यात पाणीच येईना. थोडंबहुत आलं अन्‌ बीज टाकलं तर तळं आटून जातं. मासेमारीतही नुकसान अन्‌ इकडं असं. पोरीचं लग्न केलं, अंगावर लाखभर रुपयांचं कर्ज झालंय. आता हे पीकही गेलं तर धकवावं कसं हा प्रश्न आहे. वालसा डोंगरगावचे शंकर सादरे म्हणाले, की तीस एकरातील सोयाबीन, मका, कपाशी गेल्यातच जमा आहे. वावरात जावंस वाटत नाही. जवखेडा ठोंबरे येथील नारायण ठोंबरेंच्या तीन एकर शेतातील मका व कापशीची तीच स्थिती. 

डावरगाव वालसा येथील गणपत वाढेकर म्हणाले, की पावसाअभावी मका बांड झाली. पाण्याची गरज भागविण्यासाठी शेतात तीन विहिरी, शेततळं केलं, पण वरूनच आलं नाही तर त्यात येणार कुठून. आता शेतात असलेल्या मिरचीला टॅंकरनं ईकत घेवून पाणी टाकतोय. ते पणं मिळलं तवरच चाललं. बदनापूर तालुक्‍यातील बावने पांगरी येथील दिगंबर सरोदे व रामेश्वर वखरे पावसाचा खेळ सांगताना निसर्गापुढे केलेल्या प्रयत्नांची हतबलता व्यक्‍त करीत होते.

सरोदे म्हणाले, चार एकर शेती, त्यात यंदा तीन एकर कपाशी व एक एकर मूग केला. जूनच्या सुरवातीला पडलेल्या पावसामुळे जमिनीत झालेल्या ओलीच्या भरवशावर पुन्हा पाऊस येईल या आशेने कपाशीची लागवड केली. पण पावसाच्या दांडीन कपाशीची वाढ खुंटली. मूग पार वाळून गेला. मुलं शिकतात, अभ्यासात हूशार पणं कुठही शिकायला टाकायचं म्हणजे पैसा लागतो. शेतीत घातलेला पैसा परत मिळायची आशा नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे येताहेत. त्यांना ज्यात शिक्षण घ्यावं वाटतं ते घेता येत नाही. 

रामेश्वर वखरे म्हणाले, ढगाळ वातावरणानं पिकं हिरवी दिसतात. ढग नसते तर सारं वाळून गेलं असतं. भोकरदन तालुक्‍यातील बरंजळा लोखंडे येथील निर्मलाबाई गंगाराम म्हस्के म्हणाल्या, आता पाऊस येऊनही उपेग नाही, पिकं वाळून गेलीत. दहा ईस टक्‍के आली तं नशीब म्हणावं. बदनापूर तालुक्‍यातील डोंगरगावचे देविदास उगले म्हणाले, प्यायला पाणी झालं नाही, तं पिकाला कुठून. पाऊस असा येतो की कपडे भिजत नाहीत. 

तेलकट डागाने डाळिंबाला मिळेना दर 
जालना व औरंगाबाद जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र जवळपास साडेचार हजार हेक्‍टर आहे. बहुतांश बागांमध्ये बुरशीजन्य व तेलकट डागांमुळे फळांना उचल नसल्याचे बदनापूर तालुक्‍यातील दुधनवाडीचे सुखदेव पडूळ म्हणाले. डागांमुळे यंदा डाळिंबाच्या बागांवर केलेला खर्च वसूल होईल की नाही अशी स्थिती असल्याचे पडूळ यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...