पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त

मराठवाडा पाऊस पडूनही टॅंकरग्रस्त
मराठवाडा पाऊस पडूनही टॅंकरग्रस्त

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख ४७ हजार ३७२ नागरिक टॅंकरवर अवलंबून आहेत. त्यांची तहान भागविण्यासाठी प्रशासनातर्फे ३५४५ टॅंकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. दुष्काळाची दाहकता अनुभवत असलेल्या मराठवाड्याच्या बहूतांश भागात कमी अधिक प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. परंतु, अजूनही पाण्याची उपलब्धता झालेली नाही. टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत व टॅंकरच्या संख्येत भरच पडत असल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ७८५ गाव व २७३ खेड्यातील १९ लाख ४२ हजार ६५१ लोकांसाठी ११७४ टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील ५५८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील ५६४ गाव व १२६ वाड्यांमधील १२ लाख ६९ हजार ४९९ लोकांसाठी ७०९ टॅंकर सुरू आहेत. ७१२ विहिरी अधिग्रहित आहेत. परभणी जिल्ह्यातील ८७ गाव व २० वाड्यांधील १ लाख ७४ हजार ६७७ लोक टंचाईची झळ सोसत आहेत. याठिकाणी १०६ टॅंकर सुरू आहेत. ४८९ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील ५१ गाव व ५ वाड्यांमध्ये जलसंकट भेडसावत आहे. त्या ठिकाणी ७५ टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील ५४२ विहिरींचेही पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात ७७ गाव व २६ वाड्यांसाठी  १३८ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. जिल्ह्यातील १०७३ विहिरी अधिग्रहित आहेत. औरंगाबादपाठोपाठ बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. ६४ गाव व ३६५ वाड्यांमधील १४ लाख २ हजार ७४८ लोकांसाठी ९८५ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. जिल्ह्यातील १०२४ विहिरींचे टॅंकर व टॅंकरव्यतिरीक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे.

लातूर, उस्मानाबादेत टंचाईची झळ

लातूर जिल्ह्यातील ८९ गाव व २२ वाड्यांमधील २ लाख ४३ हजार ३७४ लोकांसमोर पाणीसंकट आहे. ते निवारण्यासाठी ११५ टॅंकर सुरू आहेत. १२१७ विहिरी अधिग्रहित आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील १७५ गाव व ११ वाड्यांमधील ४ लाख २८ हजार ४२७ लोकांची तहान टॅंकरशिवाय भागत नाही. येथे २४३ टॅंकर सुरू आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com