अकोले तालुक्‍यात पाऊस सुरूच

 पिंपळगाव खांड धरण भरले
पिंपळगाव खांड धरण भरले

नगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात बुधवारीही (ता.२७) पाऊस सुरूच होता. मात्र मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर कमी झाला होता. हरिश्‍चंद्रगड भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. अकोले तालुक्‍यातील भरलेले हे दुसरे धरण आहे.

पिंपळगाव खांड धरणाची पूर्वी ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता होती. भिंतीची उंची यंदा दोन मीटरने वाढविल्यामुळे पाणी साठवणक्षमता आता ६०० दशलक्ष घनफूट झाली आहे. बुधवारी सकाळी भिंतीवरून तीन हजार क्‍युसेक पाणी वाहत होते. मागील वर्षीच्या तुलनेत धरण यंदा लवकर भरले. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

भंडारदरा, रतनवाडी, वाकी, पांजरे, घाटघर परिसरातही पाऊस सुरूच आहे. मात्र मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर कमी होता. अकोले तालुक्‍याचा भाग वगळता जिल्ह्यातील अन्य भागात मात्र अजिबात पाऊस नाही. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. फोफसंडी, पाचनई, लव्हाळी या पट्ट्यात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. जलसंपदा विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे भंडारदरा धरणात ७६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

अकोले तालुक्‍यात बुधवारी (ता.२७) सकाळी नोंदलेला पाऊस (मि.मी.)   भंडारदरा ः ४३, पांजरे ः ७७, घाटघर ः ७२, रतनवाडी ः ६०, वाकी ः ७२, निळवंडे ः १७, अकोले ः १०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com