agriculture news in marathi, rain continue, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

सातारा   ः जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १३.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहे. काढणीला आलेल्या पिकांच्या नुकसानीत पावसामुळे भर पडत आहे. सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण या तालुक्यांत पावसाचे प्रमाण जास्त आहे. या भागात गुरुवारी दुपारी पाऊस सुरू झाला.

सातारा   ः जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १३.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहे. काढणीला आलेल्या पिकांच्या नुकसानीत पावसामुळे भर पडत आहे. सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण या तालुक्यांत पावसाचे प्रमाण जास्त आहे. या भागात गुरुवारी दुपारी पाऊस सुरू झाला.

मध्यरात्री अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील पिकांची काढणी करता येत नाही. त्यामुळे सध्या सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. दुष्काळी खटाव, माण, खंडाळा या तालुक्यांत हलका स्वरूपाचा पाऊस झाला आहे. या तालुक्यात पिके भरण्यासाठी अजूनही पावसाची गरज आहे. या तालुक्यात अजूनही अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिमी) ः सातारा २९.७१, जावली ५.७८, पाटण ६.३६, कऱ्हाड २२.४६, कोरेगाव २०.४६, खटाव ७.३०,माण३.८६, फलटण१३.५६, खंडाळा १.७०, वाई ५.५१, महाबळेश्र्वर १.८५.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...