agriculture news in marathi, rain continue in satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

सातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण, खटाव, फलटण, सातारा, जावली तालुक्‍यांत पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १२.८ मिमी पावसाची नोंद झाली. वाई तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला आहे.

सातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण, खटाव, फलटण, सातारा, जावली तालुक्‍यांत पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १२.८ मिमी पावसाची नोंद झाली. वाई तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात कराड व पाटणचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्‍यांत पावसाचा जोर कायम आहे. वाई तालुक्‍यात पावसाचा जोर जास्त असल्याने तालुक्‍यातील अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले होते. दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्‍यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला आहे. या पावसाने दुष्काळी तालुक्‍यात झालेल्या जलसंधारणाच्या कामात पाणी साचले आहे. यामुळे पाणीटंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे.

हा पाऊस पेरणी केलेल्या पिकांना तसेच पेरणीस पोषक वातावरण होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. जशी जमीन वाफशावर येईल तशी पेरणीच्या कामांना गती येणार आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आडसाली ऊस लागवडीच्या कामे सुरू असून, या पावसामुळे ऊस लागवडीची गती वाढणार आहे. तालुकानिहाय पाऊस (मिमी) ः सातारा १५.३, जावली १५.६, पाटण १.६, कराड ०, कोरेगाव ६.७, खटाव १०.२, माण १७.४, फलटण १२.८, खंडाळा १०.७, वाई २८.९, महाबळेश्वर २१.७.

 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...