agriculture news in Marathi, Rain decreases in Varhad Region | Agrowon

वऱ्हाडात पावसाचा जोर ओसरला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

अकोला  ः वऱ्हाडात मागील अाठ दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कमी झाला अाहे. तीनही जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचे प्रमाण कमी झाले अाहे. ढगाळ वातावरण कायम अाहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात १६.३, बुलडाणा जिल्ह्यात ११.९ तर वाशीममध्ये १५.५ मिमी पावसाची नोंद झाली अाहे.    

अकोला  ः वऱ्हाडात मागील अाठ दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कमी झाला अाहे. तीनही जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचे प्रमाण कमी झाले अाहे. ढगाळ वातावरण कायम अाहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात १६.३, बुलडाणा जिल्ह्यात ११.९ तर वाशीममध्ये १५.५ मिमी पावसाची नोंद झाली अाहे.    

गेल्या अाठ दिवसात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. मंगळवारी (ता.२१) सुद्धा पाऊस झाला. बुधवारी (ता.२२) ढगाळ वातावरण थोडे कमी झाले. संततधार पावसाने या भागातील प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. सखल भागातील पिकांमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही पाणी साचलेले अाहे. सततच्या पावसामुळे तोडणीला अालेल्या मुगाच्या शेंगांचे नुकसान झाले. काही ठिकाणी शेंगामध्ये कोंब बाहेर येण्याची शक्यता वाढली होती.

या मोसमात बुलडाणा जिल्ह्यात अातापर्यंत कमी पाऊस झाल्याने चिंताजनक स्थिती होती. परंतु या अाठवड्यात पावसाची तूट भरून निघाली.  अकोला जिल्ह्यांतील प्रकल्पांना तर पावसाचा सर्वाधिक लाभ झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील ३४४ दलघमी एकूण क्षमता असलेला उमा प्रकल्प तुडुंब भरला. यातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू अाहे.  याच जिल्ह्यातील वान प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्क्यांपर्यंत पोचला असून सातपुड्यातून सातत्याने पाण्याची अावक होत असल्याने पाण्याचा विसर्ग केला जाणार अाहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात अाला अाहे. या प्रकल्पात सध्या ६५.४७ दलघमी पाणीसाठा अाहे.

काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा ७४ टक्क्यांवर पोचला आहे. या प्रकल्पात सध्या ६३.३७३ दलघमी साठा अाहे. वाशीममधील बहुतांश मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने वाढत अाहे.  बुधवारी पावसाने उघडीप दिली असल्याने जनजीवन पूर्वपदावर अाले. शेतांमधील कामे मात्र पूर्णतः ठप्पच अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
'आणखी साखर तयार कराल, तर खड्ड्यात जाल'विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे...
शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला...वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील...
धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी...भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीरपुणे  : जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच...
नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल...नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने ३८५७ क्विंटल...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य...
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे...जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड...
नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळपनांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड...
गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि...
अनुकूल हवामानामुळे यंदा दर्जेदार...सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान...
एकतीस वर्षांतही संपले नाही गोसेखुर्द...भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे...
शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार...फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे...
बागायती कोल्हापूरचा दुष्काळग्रस्तांना...कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी...
नागपूर विभागातील प्रकल्पात  उरला १० टक्...नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये...
यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंदयवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात...
माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरेमुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी...
शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर...नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्पजळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील...
नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार...नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८...