agriculture news in Marathi, rain deficit in state, Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाची दडी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे: पोषक हवामान नसल्याने राज्यात मॉन्सूनच्या पावसाने दडी मारली आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती राहणार असून, मंगळवारपर्यंत राज्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. 

पुणे: पोषक हवामान नसल्याने राज्यात मॉन्सूनच्या पावसाने दडी मारली आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती राहणार असून, मंगळवारपर्यंत राज्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. 

पश्‍चिम उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेले हवेचे कमी दाबचे क्षेत्र, पंजाबच्या फिरोजपूरपासून कमी दाबाच्या केंद्रातून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस यामुळे उत्तर भारतात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर पूर्व भारतातही ढगांची दाटी झाली आहे. महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतामध्ये मात्र हलके ढग असल्याने पावसाने दडी मारली आहे.

दिवसभर ढगाळ हवामानाबरोबरच एक-दोन सरी वगळता राज्यात पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. 
पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारपर्यंत (ता. ३०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत असून, आजपासून (ता. २८) ईशान्य भारतामध्ये पावसाचा प्रमाण वाढणार आहे. मंगळवारपर्यंत (ता. ३१) कोकणात अनेक ठिकाणी, तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या  सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : 
कोकण : चिपळूण २७, मार्गतम्हाणे २२, सावर्डे २६, कळकवणे ३७, शिरगाव ७२, पटपन्हाले ३५, मंडणगड ३०, म्हाप्रल ३३, देव्हरे २७, फुंगुस २१, सवंडल ३४, नाटे २२, सातवली २२, विलवडे २०.
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी २१, शेंडी २४, मुठे २५, भोलावडे २२, हेळवाक २८, महाबळेश्‍वर २६, तापोळा २८, लामज ४७, चरण ३०, करंजफेन २८, आंबा ६०, राधानगरी २२, साळवण ७५. 

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...