मुंबई ः शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्
बातम्या
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ४९ लाख १० हजार ९१४ हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. त्या तुलनेत जून संपत आला असताना मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १६ लाख ५३ हजार २५७ हेक्टरवरच खरिपाची पेरणी उरकली आहे. प्रस्तावित क्षेत्राचा विचार करता, अजून जवळपास तिप्पट क्षेत्रावर पेरणी बाकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा मराठवाड्यात खरिपात तृणधान्याची ९ लाख ५० हजार ६९६ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली. त्या तुलनेत १ भात, ज्वारी, बाजरी, मका व इतर तृणधान्याची १ लाख ४८ हजार २३८ हेक्टरवर पेरणी झाली. कडधान्याची ८ लाख ६८ हजार ३९२ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्या तुलनेत २ लाख ४५ हजार २७५ हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे. पेरणी उरकलेल्या क्षेत्रात सर्वाधिक ६ लाख ३८ हजार ७४८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यंदा कपाशीचे क्षेत्र १७ लाख १७ हजार ४५१ हेक्टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे, तर १० लाख ३८ हजार ८९० हेक्टरवर प्रस्तावित करण्यात आलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रापैकी ६ लाख १४ हजार ३८४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. क्षेत्र जास्त दिसत असले तरी अपेक्षीत क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनची ५९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली, तर कपाशीची ३७ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.
यंदा मराठवाड्यात खरीप ज्वारीची ४ लाख १७ हजार ४१५ हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. त्या तुलनेत ४० हजार ८४१ हेक्टरवर अर्थात प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९.७८ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. बाजरीची २ लाख ३४ हजार ९८० हेक्टरवर पेरणी अपेक्षित असताना २० हजार ४१७ हेक्टरवरच बाजरीची पेरणी झाली आहे. २ लाख ५३ हजार ६६८ हेक्टर प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत मक्याची ८५ हजार ६४ हेक्टरवर लागवड झाली आहे. तुरीचे क्षेत्र ५ लाख २० हजार हेक्टरवर प्रस्तावित करण्यात आले. त्या तुलनेत १ लाख ४४ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे.
- 1 of 572
- ››