agriculture news in marathi, Rain at the end of Aurangabad district finally | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

औरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यावर अखेर शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाची कृपा झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील ५७ मंडळांत पावसाने हजेरी लावली. यापैकी तीन मंडळांत ९० मिलिमीटर पाऊस झाला. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा मंडळात ७२ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीची मंदावलेली गती वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

औरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यावर अखेर शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाची कृपा झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील ५७ मंडळांत पावसाने हजेरी लावली. यापैकी तीन मंडळांत ९० मिलिमीटर पाऊस झाला. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा मंडळात ७२ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीची मंदावलेली गती वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५७ मंडळात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. त्यापैकी १५ मंडळांत काही ठिकाणी २५, तर काही ठिकाणी ६४ मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला. तर २७ मंडळांत काही ठिकाणी १०, तर काही ठिकाणी २३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. १५ मंडळांत तुरळक ते हलका पाउस पडला. जोरदार पावसामुळे जलसंधारणाची अनेक कामे तुडुंब झाली. तर नाल्यांना व ओढ्यांना खळखळून पाणी वाहले.

औरंगाबाद तालुक्‍यातील औरंगाबाद मंडळात ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ उस्मानापूरा ३३, भावसिंगपुरा १६, लाडसावंगी १८, करमाड १२, वरूडकाझी २५, फुलंब्री तालुक्‍यातील फुलंब्री १८, पैठण तालुक्‍यातील पाचोड ४७, विहामांडवा १९, नांदर ३३, ढोरकीन १८, सिल्लोड तालुक्‍यातील सिल्लोड व अजिंठा मंडळांत प्रत्येकी १७, सोयगाव तालुक्‍यातील बनोटी मंडळात ४३, वैजापूर तालुक्‍यातील वैजापूर ३४, शिवूर २५, खंडाळा १८, महालगाव ६४, लाडगाव ४२, लासूरगाव १६, नागमठाण १९, गंगापूर तालुक्‍यातील गंगापूर ४४, वाळूज १८, शेंदूरवादा १५, सिद्धनाथवडगाव ५२, हर्सूल १५, तुर्काबाद ३२, कन्नड तालुक्‍यातील कन्नड २६, चिकलठाणा १८, देवगाव रंगारी ३०, नाचनवेल २३, खुलताबाद तालुक्‍यातील बाजारसावंगी मंडळात  १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यात सरासरी १४.८० मिलिमीटर, भोकरदन तालुक्‍यात सरासरी १५ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्‍यात सरासरी १६.७१ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्‍यात १५.४३ मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यात सरासरी १५.७१ मिलीमीटर, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्‍यात १२.४३ मिलीमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्‍यात १०.७५ मिलिमीटर, वाशी तालुक्‍यात सरासरी ३१.६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वीज पडून आठ जणांचा मृत्यू, तीन जखमी
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत गुरुवारी (ता. २१) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसादरम्यान वीज पडून आठ जण मृत्युमुखी पडले, तीन जण जखमी झाल्याची प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...