agriculture news in marathi, Rain fall of the crop | Agrowon

पावसाची दडी पिकाच्या मानगुटीवर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बत्तीस टक्‍के पेरणी आटोपली. पाऊस येईल या आशेवर दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी पेरणीची गती वाढविली. परंतु अंदाज चुकविणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा घात करण्याचेच काम केले आहे. कुठे आठ दिवस, कुठे पंधरवडा लोटूनही पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या व पेरणी राहिलेल्या साऱ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. खासकरून औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत चिंतेचे ढग अधिक गडद झाले आहे.  

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बत्तीस टक्‍के पेरणी आटोपली. पाऊस येईल या आशेवर दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी पेरणीची गती वाढविली. परंतु अंदाज चुकविणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा घात करण्याचेच काम केले आहे. कुठे आठ दिवस, कुठे पंधरवडा लोटूनही पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या व पेरणी राहिलेल्या साऱ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. खासकरून औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत चिंतेचे ढग अधिक गडद झाले आहे.  

औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील थोडा भाग वगळता जवळपास सर्वच भागांत पावसाने पंधरवड्यापासून ओढ दिल्याची स्थिती आहे. मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातही तुरळक अपवाद वगळता पावसाने आठवडाभरापासून दडी मारली आहे. २५ जूनच्या आसपास पेरणी झालेल्या लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील पिकांनी अजून जमीन सोडली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील मुर्शीदाबाद, दहेगाव बंगला, शिरेसायगाव, लासूर स्टेशन परिसरातील काही गावांत पेरणीचा टक्‍का प्रचंड कमी आहे. जालना जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे अनेक गावात अजून पेरणीच नाही. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. २५ जूनच्या आसपास पेरणी झालेल्या भागात येत्या तीन ते चार दिवसांत पाऊस येण्याची गरज आहे.

२८ जूनअखेर पेरणीची स्थिती
मराठवाड्यात यंदाच्या खरिपात ४९ लाख १० हजार ९१४ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. त्या तुलनेत जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १६ लाख ५३ हजार २५७ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी उरकली होती. प्रस्तावित क्षेत्राचा विचार करता पेरणी झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात तृणधान्याची १ लाख ४८ हजार २३८ हेक्‍टरवर पेरणी झाली. तर कडधान्याची २ लाख ४५ हजार २७५ हेक्‍टरवर पेरणी झाली. ६ लाख ३८ हजार ७४८ हेक्‍टरवर कपाशीची  सोयाबीनची ६ लाख १४ हजार ३८४ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

एक एकर कपाशी पंधरवड्याखाली लावली होती. काही उगवली, काही नाही. जी उगवली ती जळून गेली. आता पावसाची वाट पाहतोय. आला की लावू, काय करावं.
- अनिल वाल्ले,
पांढरी ओहळ, ता. गंगापूर जि. औरंगाबाद.

पेरणी बंद केलीया. आधी दोन बॅगा टाकलो ते वाफलं नायं. सहा बॅगा सोयाबीन टाकलो त्यावर एक बारीक धडका आला. पंधरा दिसांपासून पाणी नाय.
- त्र्यंबक कवाळे,
हारेगाव, ता. औसा, जि. लातूर.

भयानक स्थिती आहे. पेरणीच नाही, बियाणं खतं आणून ठेवलं पण पाणी नाही. वैरणीचा प्रश्न आहे. आठ दहा दिवस पुरलं एवढाचा चारा शिल्लक आहे.
- प्रभाकर अंभोरे,
सिपोरा अंभोरे, ता. जाफ्राबाद, जि. जालना.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...