agriculture news in marathi, Rain fall in Kolhapur district | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २८) दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, दुपारी चारनंतर विशेषतः पश्‍चिम भागात पुन्हा पावसाला सुरवात झाली. तर पावसाचा जोर ओसरला असला तरी नद्यांच्या पाणीपात्रात वाढ कायम आहे. अद्यापही अकरा बंधारे पाण्याखाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

कोल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २८) दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, दुपारी चारनंतर विशेषतः पश्‍चिम भागात पुन्हा पावसाला सुरवात झाली. तर पावसाचा जोर ओसरला असला तरी नद्यांच्या पाणीपात्रात वाढ कायम आहे. अद्यापही अकरा बंधारे पाण्याखाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात सरासरी १३.५६ टक्के पाऊस झाला आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे हे तीन बंधारे पाण्याखाली आहेत. तर कासारी नदीवरील यवलूज हा एक बंधारा पाण्याखाली गेला आहे.

पाटंबधारे विभागाच्या गुरुवारी सकाळच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २३ फूट ५ इंच, सुर्वे २२ फूट ६ इंच, रुई ५२ फूट, इचलकरंजी ४८ फूट, तेरवाड ४३ फूट, शिरोळ ३३ फूट, नृसिंहवाडी २४ फूट. इतकी होती. पश्‍चिमेकडील काही तालुक्यात धरणक्षेत्रात थांबून थांबून चांगल्या सरी सुरू असल्याने धरणातील गुरुवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंतचा विविध प्रकल्पांतील पाणीसाठा याप्रमाणे ः राधानगरी - २.५४ (८.३६१), तुळशी १.६४ (३.४७१), वारणा १५.२० (३४.३९९), दूधगंगा ७.८० (२५.३९३), कासारी ०.८३ (२.७७४), कडवी १.३७ (२.५१५), कुंभी १.२१ (२.७१३), पाटगाव १.४१ (३.७१६), चिकोत्रा ०.१९ (१.५२२), चित्री ०.५० (१.८८६ ), जंगमहट्टी ०.३९ (१.२०८), घटप्रभा १.५५ (१.५४५), जांबरे ०.३४ (०.८२० टीएमसी) आणि कोदे ल. पा. ०.१३ (०.२१४).

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...