सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमीच ः पेरण्या खोळंबल्या
सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमीच ः पेरण्या खोळंबल्या

सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमीच ः पेरण्या खोळंबल्या

सोलापूर :  जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने आपली गती मंद केली असून, जूनचा पहिला महिना संपला, तरी अद्यापही गतवर्षीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात १५६.१३ मिलिमीटर पाऊस झाला होता. पण यंदा आतापर्यंत सरासरी ७८.१५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शिवाय उगवलेली पिकेही आता माना टाकण्याच्या स्थितीत आहेत.

जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी असला तरी खरिपातही बऱ्यापैकी पिके घेतली जातात. तूर, सोयाबीन, मका, सूर्यफूल आदी पिकांचा प्रामुख्याने त्यात समावेश आहे. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र १ लाख ९८ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी २५ टक्‍क्‍यांच्याही पुढे खरीप क्षेत्र सरकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.

यंदाही मृग नक्षत्रात पावसाने चांगली सुरवात केली. त्यानंतर पंधरवड्याने पुन्हा जोरदार झालेला पाऊस नंतर गायब झाला. अद्यापही तो पुन्हा बरसलेला नाही. गेल्या वर्षी याच महिन्यात पहिल्या आठवड्यात १५६.१३ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ७८.१५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर या भागात पावसाचा सर्वाधिक जोर राहिल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसते; पण तो सरसकट झालेला नाही. अनेक भागात आजही शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) उत्तर सोलापूर ८९.१४, दक्षिण सोलापूर ६४.३०, बार्शी १३०.२, अक्कलकोट ९९.४२, मोहोळ ७५.९५, माढा ६५.७९, करमाळा ६२.२९, पंढरपूर ८३.१४, सांगोला ६४.६४, माळशिरस ६२.९८, मंगळवेढा ६१.९६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com